महा आवाज News

महापूर, कोरोनाकाळात संजयकाकांनी पळ काढला*

विशाल पाटील, मिरजेत भव्य पदयात्रा, मोटारसायकल रॅली, नागरिक, महिला, फळ-भाजी विक्रेते, खेळाडू, ज्येष्ठांशी संवाद* 
 सुधीर पाटील
 आटपाडी
 बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क:9373004029
आटपाडी :सांगली  महापूराच्या काळात लोकप्रतिनिधी असलेले संजयकाका पाटील गायब झाले होते. तर कोरोना काळात त्यांनी घरही सोडले नाही. संकटसमयी पळ काढणाºया संजयकाकांना घरी बसवा, असे आवाहन अपक्ष उमेदवार विशालदादा पाटील यांनी केले.
सांगली लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार विशालदादा पाटील यांच्या प्रचारार्थ मिरज शहरात मोटारसायकल रॅली, पदयात्रा काढण्यात आली. या रॅलीला मोठा प्रतिसाद मिळाला. सकाळी विशालदादा पाटील यांनी मॉर्निंग वॉक करणाºया नागरिक, महिला, ज्येष्ठांशी संवाद साधला. त्यानंतर खेळाडू, फळ विक्रेते, भाजी विक्रेत्यांशी त्यांनी चर्चा करीत समस्या जाणून घेतल्या. या रॅलीत माजी नगरसेवक निरंजन आवटी, माजी महापौर मैनुद्दीन बागवान, संदीप आवटी, माजी विरोधी पक्षनेते संजय मेंढे, माजी नगरसेवक संदीप आवटी, महमंद मणेर, अजित दोरकर, करण जामदार, अय्याज नायकवडी, आझम काझी, वसीम रोहिले, अशोक कांबळे यांच्यासह अनेक कार्यकर्ते, महिला, नागरिक सहभागी झाले होते. वंटमुरे कॉर्नर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान, छत्रपती शिवाजी क्रीडांगण, कर्मवीर भाऊराव पाटील चौक, संजयनगर, जैन वस्ती कमान, चर्च रोड, इसापुरे गल्ली, कुंभार गल्ली, स्टेशन रोड, मीरासाहेब दर्गा, वखारभाग, पंचशील चौक, गवळी गल्ली, सराफ कट्टा मार्गे गणेश तलाव येथे रॅलीची सांगता झाली. यावेळी  ठिकठिकाणी महिला भगिनींनी विशालदादांचे औक्षण केले. ज्येष्ठ नागरिकांनी त्यांना आशिर्वाद दिला.
विशाल पाटील म्हणाले की, संजयकाकांनी दहा वर्षात मिरजेच्या विकासासाठी काहीच योगदान दिले नाही. केवळ मोठमोठ्या घोषणा करण्यापलिकडे त्यांचे काम नाही. दुसºयाच्या कामाचे नारळ फोडण्यातच त्यांनी धन्यता मानली. महापूराच्या काळात संजयकाका पाटील जनतेच्या मदतीला धावले नाहीत. जनता अडचणीत असताना त्यांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला नाही. कोरोना काळात तर ते घराबाहेरही पडले नाहीत. संकटात जनतेची साथ सोडणारा खासदार सांगली जिल्ह्याला मिळाले, हे दुर्दैव म्हणावे लागेल. अशा निष्क्रिीय खासदाराला घरी बसवा, असे आवाहनही त्यांनी केले.

इतरांना शेअर करा