महा आवाज News

पेन्शन धारकांचा विशाल दादा पाटील यांना पाठिंबा

सर्व क्षेत्रातील ईपीएस ९५ पेन्शन करांची संख्या जवळ जवळ 25 ते 30 हजार पेन्शनर कुटुंब
सुधीर पाटील 
आटपाडी 
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :9373004-29
आटपाडी : सांगली लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार विशाल दादा पाटील यांना ईपीएस पेन्शन धारकाने जाहीर पाठिंबा दिला आहे.
पाठिंबाचे पत्र माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक दादा पाटील यांना देण्यात आले. यावेळी कॉम्रेड गोपाल पाटील, दीपक कांबळे, तुकाराम पाटील, भानुदास यादव, आनंदा कांबळे, लक्ष्मण तोडकर,भाऊसाहेब यादव आनंदराव नलवडे अशोक कदम काका भगत, राजाराम यमगेकर, मारुती साळुंखे, भगवान शिंदे, चंद्रकांत घोरपडे, विजयकुमार कांबळे, पंढरीनाथ माने पाटील, चंद्रकांत शिंदे, श्रीरंग पवार, जी. टी. कदम, अरुण साळुंखे उपस्थित होते.
सांगली लोकसभा मतदारसंघातील सर्व क्षेत्रातील ईपीएस ९५ पेन्शन करांची संख्या जवळ जवळ 25 ते 30 हजार पेन्शनर (कुटुंब) आहे. देशपातळीवर आपल्या प्रलंबित पेन्शन वाढीसाठी अनेक प्रकारे धरणे आंदोलन व गेल्या दहा ते बारा वर्षे प्रयत्न करीत आहे, मात्र अद्याप या भाजप सरकारने एक रुपयाही वाढ केली नाही. त्याचप्रमाणे सांगलीचा विकास होणे ऐवजी भकास अवस्थेत  आहे. कुठलीही आर्थिक, सामाजिक राजकीय सुधारणा झालेली नाही. या सगळ्यांचा विचार करून, सांगली लोकसभा मतदारसंघातील आठ तालुक्याचे तालुकाध्यक्ष व कार्यकर्त्यांची ईपीएस 95 पेन्शन कमिटी सांगलीच्या वतीने सांगली लोकसभा मतदारसंघाचे  उमेदवार विशाल दादा पाटील यांना बिनशर्त जाहीर पाठिंबा तेच असल्याचे पत्रात म्हटले आहे.

इतरांना शेअर करा