महा आवाज News

एक तारा निखळला . आशिष शिवाजीराव भोसले याचा दहावा स्मृतीदिन बावधन ता वाई जि सातारा येथे होत आहे ,

सुधीर पाटील 
आटपाडी 
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :9373004029
सातारा वाई :27 तरुणांचा आदर्श प्रतिनिधी आशिष आपल्या स्मृती ठेवून गेला आहे.
   आशिष शिवाजी भोसले… हा आदर्श मुलगा बावधनच्या सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक  वृक्षाला लगडलेले एक सुवर्ण कांतिसम कोवळे पान… पिकले पान गळणे हा निसर्गक्रम. पण कोवळे पान गळणे हा दैवी घाला. नव्हे घावच. समाजमनाची भळभळणारी कायमची जखम!
   बावधनचे शिवाजीराव  भिकोबा भोसले यांचा आशिष हा मुलगा. २८ एप्रिल २०१४. दुपारी बाराची वेळ. गौरी शंकर कॉलेज लिंब  नजीक रस्त्यावर झालेल्या वाहन अपघातात आशिष गेला. वय तर काय? अवघे २०-२१.
आशिष च्या अचानक जाण्याने भोसले परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला.
आई वडील आजही या दुदैऺवी घटनेनंतर दु:खातून बाहेर आलेले नाहीत. ना सण ना गोडधोड खाणे. नियतीने असे का करावे? आशिषच्या स्मृतीदिनी त्याच्या जीवितध्येयाला आणि विचारांना अनुसरुन उपक्रम राबविण्याचा वसा भोसले कुटुंबाने घेतला आहे.
   आशिष हा आधुनिक श्याम (साने गुरुजी) होता. आई सुधाताई व वडील शिवाजीराव यांच्या आजारपणात त्याने केलेली सेवा आजही लोक सांगतात. आजोबांचा व वडीलांचा समाजसेवेचा व समाजॠण फेडण्याचा स्वभाव त्याने स्मरणपूर्वक तंतोतंत अंगीकारला होता. स्वभावातील ॠतुजा आणि झोकून घेऊन सेवाकार्य करणे हा त्याचा जन्मजात भाव होता. पुरोगामी विचारसरणी ही त्याच्या जीवनाची महत्ता आहे, असे मला वाटते. कष्टात आणि परिश्रमात त्याने आपला आनंद शोधला.
   मित्र, नातेवाईक, महाविद्यालय येथे तो अत्यंत लोकप्रिय होता. छत्रपती शिवाजी महाराज हे त्याचे दैवत. शिवजयंतीसाठी त्याने गौरीशंकर महाविद्यालयात घेतलेला पुढाकार त्याच्या जीवनाची ओळख होण्यास पुरेसा आहे.
   बहिण मानलेल्या मुलीसाठी भावाचे कर्तव्य बजावणारा, वयोवृद्धांना प्रेमाचे आश्वासक बळ देणारा, राजकारणात कुतूहल ठेवणारा, शेतीची आवड जोपासणारा, चराचर सृष्टीवर प्रेम करणारा, प्राणीमात्राचे प्राण वाचवणारा व तोच परमोधर्म आहे मानणारा, दुबऺलात त्राण निर्माण करणारा, निव्यऺसनी राहा असा प्रबोधनात्मक संदेश देणारा, अभिनयाची उपासना करताना ग्लॅमरला न भुलणारा, विवेकी मनाचा, उत्तम हस्ताक्षर असणारा, चांगल्याचा संग्राहक व सद्गुणांचा पूजक, आपल्या लाघवी शैलीने श्रोत्यांची मने जिंकणारा व यांत्रिक अभियांत्रिकीचे शिक्षण अंतिम टप्प्यात असताना हा लोभस मुलगा अचानक निघून गेला.
   पुढच्या पिढ्यांचा विश्र्वास बसणार नाही एवढा हा गुणी मुलगा. मातृपितृभक्त, समाजभक्त, देशभक्त, मित्रभक्त, आदशऻंचा भक्त. आपल्या माणसाचे अस्तित्व घरापुरते नसते ते हवेसारखे सर्वत्र असते. तसे आशिषचे अस्तित्व होते.
   दिवाळीत आपण शोभेचे झाड उडवितो. झाड स्वत: रिक्त होते पण रिक्त होताना दुसऱ्याला आनंद देते. तसे काहींचे जीवन असते. त्यापैकी आशिष एक होता. बालकवी अपघातात गेले तसाच हा बालमित्र अपघातात गेला. जीवन आणि मरण मानवी जीवनात सतत चाललेला लपंडावाचा खेळ आहे असे आचार्य अत्रे म्हणत.
   आशिष भेटल्यावर त्याला सोडू नये असे सर्वांना वाटे. मग अशी अर्तक्य घटना का घडावी? जीवन म्हणजे काय? मृत्यू म्हणजे काय? असे प्रश्न अशावेळी मनात थैमान घालतात. पृथ्वीतलावर पाठवताना परमेश्वर माणसाला आयुष्याचा व्हिसा देतो. व्हिसा संपला की तो बोलवितो, असे तर नसावे?
   मृत्यू हा पाहुणाच आहे. तो कधीही येऊ शकतो. जरूरी नाही की तो म्हतारपणी यावा. तरुणपणी, बालपणी तो कधीही येतो. मिळेल तेवढ्या आयुष्यात चांगले कार्य करा. जीवन सार्थकी लागेल. अशा शब्दांत तरूणसागर महाराज सांत्वना देतात. आशिष असाच जगला. मृत्यूला मोजमाप नसते. तो निकट असतो तितकाच तात्काळ देखील असे जे.कृष्णमूर्ती म्हणतात.
   ज्याचे चरित्र वारंवार आळवावे असा एक सुपूत्र बावधनच्या पवित्र व ऐतिहासिक परिसरात होऊन गेला. तो होता. आशिष शिवाजीराव भोसले. ‘मुलं ही त्या त्या जन्मदात्याची नावं धारण करणारी असली तरी ती दैवाच्याच मालकीची असतात…’ हे जीवनाचे सत्य सांगणारे प्रा. श्रीराम पुजारी यांचे वचन आशिषचे जीवन आठवताना डोळ्यांपुढे येते. आशिष हा अकाली निखळलेला तेजस्वी तारा होता. निखळतानाही प्रकाश देऊन गेला.
आशिष  बद्दल थोडक्यात बोलायचे तर तो आपल्या जवळच आहे
आसपास वावरनारी तरुण मुले आशिष चे नेतृत्व करत आहे. अशक्य काहीच नसते, ते प्रयत्नाने पूर्ण करता येते. हे जीवाचे ब्रीद वाक्य असेल ते आपले जीवन सूंदर करू शकतात, हा आदर्शवाद असेल तर जीवनात काहीच कमी पडू शकत नाही. हे आशिष ने आपल्या अल्प कर्तृत्वाने दाखवून दिले आहे.
बावधन गावची  संस्कृती,,परंपरा, एकोपा, संघटन कोशल्य, त्याचे विचार  आजच्या तरुण पिढीला एक नवीन दिशा देणारे आहेत.
आशिष च्या मम्मी आणि डॅडी
एक अभिमान वाटला पाहिजे
आपला मुलगा सर्व गुण संपन्न होता, एक आदर्श होता.
काही महत्वाचे गुण आजोबा यांच्या कडून आलेले आहेत.आण्णा यांची  ही राजकीय परंपरा , वारसा हे गुणधर्म आशिष मध्ये होती.
आज आशिष याचा नववा स्मृती दिन आपण साजरा करत असताना “प्रयत्न केल्यास यश मिळते”  ही आशिष ची तरूण ऊर्जा  समाजात  प्रभावी आदर्श व्यक्तीमत्व घडवू शकते.
हीच अक्षर श्रद्धांजली आपण सर्वांनी व्हावूया
विनम्र अभिवादन
मूळ लेखक श्री. सतीश कुलकर्णी
संपादन :-डॉ. जनार्दन भोसले ,पुणे

इतरांना शेअर करा