महा आवाज News

डिकसळ येथील ग्रामदैवत योगेश्वरी देवीच्या यात्रेला रविवारी सुरुवात..

प्रतिनिधी:- गायकवाड..
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क:-9373004029..
डिकसळ ( ता.इंदापुर) येथील ग्रामदैवत योगेश्वरी देवीच्या यात्रेला सालाबादप्रमाणे रविवार ( ता.२१) रोजी सुरुवात होत असून दोन दिवस कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. नवसाला पावणारी देवी अशा प्रकारची या देवीची ख्याती असल्यामुळे परिसरातील भाविकांची यात्रेला गर्दी होती.
     यात्रेनिमित्त संपूर्ण मंदिर परिसराची साफसफाई करण्यात आली असून मंदिराला आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. रविवार (ता.२१) रोजी पहाटे ४ वाजता देवीला अभिषेक घालण्यात येईल. सकाळी ७ वाजता पुजाऱ्याचा मानाचा दंडवत झाल्यानंतर ग्रामस्थांचे दंडवत चालू होतील. सायंकाळी ५ ते ९ शेरणी वाटप झाल्यानंतर ९ ते ११ पालखी मिरवणूक होईल त्यानंतर मनोरंजनासाठी संजय हिवरे यांचा लोकनाट्य तमाशाचे आयोजन करण्यात आले आहे.
सोमवार (ता.२२) रोजी सकाळी ८ ते ९ विडावाटप ९ ते १ मनोरंजनासाठी बहारदार लावण्यांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर ४ वाजता परिसरातील मल्लांना प्रोत्साहन देण्यासाठी जंगी कुस्ती आखाड्याचे आयोजन करण्यात आले असल्याची  माहिती डिकसळ यात्रा कमिटीने दिली.

इतरांना शेअर करा