प्रतिनिधी :सोमेश्वर लाहोरकर ,परभणी
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :9373004029
परभणी – नांदापुर येथे शिवऐक्य रंगराव भिमराव लांडगे यांच्या 23 व्या पुण्यतिथी निमित्त श्री ष.ब्र. 108 वेदांतचार्य डिगंबर शिवाचार्य महाराज वसमतकर यांचे शिव किर्तन व तसेच वीरशैव लिंगायत समाजातील समाजसुधारक याचा वीरशैव लिंगायत प्रतिष्टान वतीने गौरव असे आयोजन करण्यात आले.

कै.रंगराव भीमराव लांडगे यांचे सुपुत्र डॉ. मदन रंगराव लांडगे यांनी 23 वी पुण्यतिथी असून शिव किर्तन ,समाजातील गुणवंत अशा व्यक्ती चा गौरव करुन मोठया प्रमाणात अन्यदान करुन समाजासमोर मोठा आदर्श निर्माण केला.यांचे कारण म्हणजे आज तुम्ही आम्ही बघत आहोत मुलांकडे पैसा पद आले कि आई वडिलाना मुलांना सांभाळायला नको वाटते तेव्हा ते वृध्द आश्रम पाठवतात अशावेळी डॉ. मदन लांडगे यांनी वडिलांची 23 वी पुण्यतिथी असुन कशी करावी हा समाजाला खुप मोठा आदर्श आहे .आई वडिल आहेत तोपर्यंत मुलांनी त्यांची सेवा करावी तोच खरा परमार्थ आहे असा संदेश समाजाला या वतीने देण्यात आला.

डॉ. मदन लांडगे यांची राजकारणातील ज्येष्ठ नेते म्हणून ओळख आहे तसेच भा.वि.से.जिल्हाप्रमुख राहिलेला आहेत