संपादक:- पल्लवी चांदगुडे..
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क:- 9373004029..
राशींचे माजी सरपंच शिवदास आप्पा शेटे यांच्या माध्यमातून व शिवा संघटना राज्याचे पदाधिकारी यांनी शरद पवार यांच्याशी थेट भेट घेऊन लोकसभा निवडणुकी संदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली.
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर वीरशेव लिंगायत समाजातील प्रबळ असणारी शिव संघटना व सेवा जनशक्ती पक्ष हे महाविकास आघाडीत सहभागी होणे या विषयावरती शरद पवार यांच्यासोबत चर्चा करण्यात आली.या बैठकीत महत्त्वपूर्ण चर्चा नंतर येत्या दोन दिवसात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष मा. जयवंतराव पाटील यांच्या यांच्यासोबत शिवदास आप्पा शेटे यांच्या माध्यमातून शिवसंग्रह राज्यातील प्रमुख पदाधिकारी यांचे बैठक होणार असल्याचे सांगण्यात आले.
राशींचे माझे सरपंच शिवदास आप्पा शेटे यांच्या सहशिवा संघटनेचे राष्ट्रीय सरचिटणीस उमाकांत आप्पा शेटे शिव संघटनेचे राज्य उपाध्यक्ष शैलेश अण्णा जक्कापुरे यांच्यासह इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते.