श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या प्रकट दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन..
संपादक :- पल्लवी चांदगुडे..
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क:- 9373004029..
अनंत कोटी ब्रम्हांडनायक श्री स्वामी समर्थ मंदिर सेक्टर नंबर 4 संत नगर मोशी प्राधिकरण पुणे येथे श्री स्वामी समर्थ चॅरिटेबल ट्रस्ट संघर्ष संस्था आयोजित श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिनानिमित्त वार बुधवार दिनांक 10 एप्रिल 2024 रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे
सकाळी 7 वाजता श्री स्वामी समर्थ महाराज लघु रुद्र अभिषेक होणार आहे.10 ते 11.30 होम व नंतर पूजा होणार आहे .दुपारी बारा वाजता स्वामी महाराज यांचा जन्म सोहळा व फुलांचा वर्षाव व 12वाजता व दुपारी 1 नंतर भव्य पालखी सोहळा होणार असून पादुका पालखी परिक्रमा सोबत दिंडी ,लेझीम पथक, धाडसी खेळ होणार आहेत.
संपूर्ण संत नगर मोशी प्राधिकरण मधून होणार असून कला सागर भजनी मंडळ(विशेष अंध कलाकार) बाहुबली जय हनुमान व जीवंत देखावा होणार आहे.
भव्य रक्तदान शिबिर सकाळी 9 ते दुपारी 4 पर्यंत असून महाआरती वमहाप्रसाद सायंकाळी 7 नंतर प्रमुख उपस्थित मान्यवराना महाप्रसादाचा लाभ मिळेल.
मा श्री महेशदादा लांडगे मा श्री धनंजय भाई देसाई यांच्यासह
आयोजक पंकजभाऊ शिवाजी पवार आणि सहकारी भक्तमंडळी
या भव्य कार्यक्रमला समस्त ग्रामस्थांना आमंत्रण करण्यात येत आहे. सर्वांनी याचा लाभ घ्यावा..