महा आवाज News

मा.गोरख अनुसे यांची सायकल वरील अयोध्या यात्रा यशस्वी

मा. तानाजीराव पाटील यांचे कडून स्वागत व सत्कार: सर्व स्तरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव.

प्रतिनिधी :सुधीर पाटील
आटपाडी

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :9373004029

आटपाडी :आटपाडी तालुक्यातील अनुसेमळा येथील मा.गोरख विठ्ठल अनुसे आटपाडी यांनी आटपाडी ते अयोध्या,अयोध्या ते आटपाडी सायकल यात्रा पूर्ण केली आहे.आहे. मा.गोरख अनुसे हॅंडीकॅप असूनही १६०० किलोमीटर जाऊन,परत येणे ही अयोध्या सायकल यात्रा १७ दिवसात यशस्वी पूर्ण केल्याबद्दल आटपाडी तालुक्यातील अनेक मान्यवरानी त्यांचा सामाजिक,राजकीय,आणि मित्रपरिवार यांच्याकडून स्वागत करून सत्कार घेण्यात आला.
यावेळी शाल,श्रीफळ,हार,गुच्छ देऊन सत्कार करताना सांगली जिल्हा बँकेचे संचालक मा.तानाजीराव पाटील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती पै.संतोष (भाऊ)पुजारी, सुबराव (नाना) पाटील,अध्यक्ष ऋषिकेश देशमुख,किशोर जाधव, विकी पाटील,दत्तात्रय जेडगे, हरी पाटील,कैलास पाटील, वसंत अर्जुन, प्रकाश देशमुख, बबलू जगताप, आदी मान्यवर उपस्थित होते. आणि पुढील भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

इतरांना शेअर करा