प्रतिनिधी:- पल्लवी चांदगुडे..
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क:- 9373004029..
लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी इंदापूर विधानसभा मतदारसंघात नियुक्त क्षेत्रीय अधिकारी व कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण पंचायत समिती सभागृह इंदापूर येथे आयोजित करण्यात आले.
या प्रशिक्षणामध्ये ईव्हीएमचे बॅलेट युनिट व कंट्रोल युनिट तसेच आणि व्हीव्हीपॅट बाबत प्रथम स्तरीय तपासणी (एफएलसी), द्वितीय स्तरीय तपासणी (एसएलसी), सरमिसळ (रँडमायझेशन) व कार्यान्वयन (कमिशनिंग) प्रक्रियेविषयी आणि व्हीव्हीपॅट वाहतूकीबाबत माहिती देण्यात आली. निवडणुकीच्या दिवशी मतदान सुरू होण्यापूर्वी करण्यात येणाऱ्या अभिरूप मतदान (मॉकपोल), मतदानाच्यावेळी तांत्रिक बिघाड निर्माण झाल्यास करावयाच्या उपायोजनांबाबतही माहिती देण्यात आली.
इंदापूर विधानसभा मतदारसंघाचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी कल्याण पांढरे आणि सहायक निवडणूक निर्णय अधिकारी श्रीकांत पाटील यांच्या मार्गदर्शखाली आयोजित करण्यात आले. प्रशिक्षक रवींद्र पिसे, उप अधीक्षक भूमी अभिलेख विजयकुमार आतार यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले.
पोलीस ठाण्यात मतदान जनजागृती
इंदापूर पोलीस ठाण्यात शिक्षण विभाग इंदापूर मतदार जागृती मंचाच्यावतीने मतदार जागृती अभियानांतर्गत कार्यक्रम घेण्यात आला. या प्रसंगी पोलीस उपनिरीक्षक आर. बी. कदम आणि पोलीस कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमात शिक्षण विस्तार अधिकारी संजय रुईकर यांनी मतदार नोंदणी व नावात दुरुस्ती तसेच क्यूआर कोडद्वारे मतदार यादीत नाव शोधणे आदींचे मोबाईलवरून प्रात्यक्षिक दाखविले.