वनविभागात गोलमाल: मृद-जलसंधारणाची कामा बद्दल संशय
प्रतिनिधी:- सुधीर पाटील..
बातमी व जाहिरातीसाठी संपर्क:-9373004029..
आटपाडी :आटपाडीतील वनविभागाचा शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी पंचनामा केला.आटपाडी मध्ये मनमानी कारभार करून वनविभाग व ठेकेदारांनी वैयक्तिक लाभासाठी कार्यरत असलेले आटपाडीतील वनक्षेत्रपाल अशोक खाडे, वनपाल अस्मिता पाटील, ज्योती घोगरे यांनी ठेकेदारांसोबत संगनमत करून जिल्हा नियोजनमधून एक कोटींच्या रुपये कामांचा गोलमाल केला आहे. ही कामे तात्काळ थांबविण्याची मागणी काही गावच्या सरपंचां सह सेना कार्यकर्ते यांनी केली आहे.
जिल्हा नियोजन निधी मधून आटपाडी तालुक्यातील घरनिकी, घाणंद, जांभुळणी, नेलकरंजी, पारेकरवाडी, पिंपरी बुद्रुक, लेंगरेवाडी, विभुतवाडी,झरे, तळेवाडी,या गावामध्ये
वनविभागामार्फत सुरू असणाऱ्या कामांची माहितीच गावकऱ्यांसह ग्रामपंचायतींना सुद्धा नाही. त्याबाबत चौकशी केल्यानंतर सर्व कामे ठेकेदारांसोबत संगनमत करत असल्याचे सातत्याने स्पष्ट झाले आहे.परंतु जांभुळणी, घाणंद सरपंचांनी या कामांमध्ये वनविभाग गोलमाल करत असल्याचे निदर्शनास आणून शिवसेना युवा सेनेचे तालुकाप्रमुख मनोज नांगरे, युवा नेते महादेव जुगदर, किसन कटरे यांच्यासह विविध गावच्या सरपंचांनी अधिकाऱ्यांना जाब विचारला
असता.वनपाल अस्मिता पाटील, ज्योती घोगरे याच सेना पदाधिकाऱ्यांनाच उध्दट भाषा वापरत आहेत. कामाचे अंदाजपत्रक दाखविणार नाही. काम कोणते चालु आहे सांगणार नाही. ठेकेदार आणि आमचे आम्ही बघून घेवू अशी उत्तरे या महिला कर्मचारी देत आहेत. कोणत्याच कामाची एम.बी आम्ही नाही तर ठेकेदारच लिहील असे सांगत वनपाल अस्मिता पाटील, ज्योती घोगरे यांच्यासह वनक्षेत्रपाल अशोक खाडे यांनी आपला विभाग कामाबाबत कितपत दक्ष आहे. याची प्रचिती दिली.
काही गावात चेकडॅम,गॅबियन स्ट्रक्चर, गॅबियन बंधारा,
सलग समतल चर, माती नालाबांध
आदी कामे मंजुर आहेत. मृद व
जलसंधारणाला प्रोत्साहन देण्यासाठी
एक कोटींचा निधी मंजूर करण्यात
आला आहे.मुळात आटपाडी वनविभाग ही जलसंधारणासाठी वनविभाग काम करत नसून ठेकेदारांच्या आडून आपली घरे भरण्यासाठी काम करत असल्याचा गंभीर आरोप सेना कार्यकर्त्यांनी केला आहे.
तालुक्यात वनविभागामार्फत होणारी जलसंधारणाची कामे गुणवत्तापुर्णच झाली पाहिजेत. शिवाय ज्या गावच्या हद्दीत कामे सुरू आहेत, तेथील लोकांना त्याची माहिती दिलीच पाहिजे, अशी मागणी याप्रसंगी करण्यात आली. जोपर्यंत या कामांची जी काही वस्तुस्थिती पुढे येत नाही, तोपर्यंत कामे पूर्ण बंद ठेवावीत, अशी मागणीही यावेळी शिष्टमंडळाने वनक्षेत्रपालांकडे केली.
आटपाडी वनविभागाचे काम नेहमी वादग्रस्त आणि मनमानीपुर्ण बनत आहे.वनक्षेत्रपाल अशोक खाडे यांच्यासह अस्मिता पाटील, ज्योती घोगरे यांच्या कामकाजाबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देवून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणीही सेना पदाधिकारी यांच्याकडून याप्रसंगी करण्यात आली.
चौकट :
वर्कऑर्डर कागदोपत्रात गोलमाल,अनेक कामात भष्टाचार :
मृद व जलसंधारणाच्या कामांना जिल्हा नियोजनमधून निधी मंजुर झाला. त्याचा प्रशासकीय आदेश १४ मार्च २०२४ रोजी निघाला.नंतर लगेच अवघ्या दोन दिवसात १६ मार्च रोजी आचारसंहिता लागली. आम्ही वरिष्ठाच्या सांगण्यावरून टेंडर प्रक्रिया पूर्ण करून काम करत आहे कसे त्यांच्या सांगण्यातून आले. मग या कालावधीत टेंडर प्रक्रिया झाली केव्हा,कोणत्या वर्तपत्र मध्ये प्रसिध्दी झाली आणि वर्कऑर्डर देवून प्रत्यक्षात काम सुरू झाले कधी ? ही सर्व बोगस टेंडर प्रक्रिया राबवून पाठीमागील महिन्यातील पेपर निविदा जाहिरात काढून, ठेकेदार यांना वर्क ऑर्डर देण्याचे आदेश कसे काढले ही संपुर्ण प्रक्रिया बोगसगिरीने कागदोपत्री रंगवून वनक्षेत्रपाल, वनपाल यांनी राबविली आहे. याला वरिष्ठांना कसे अभय दिले? असा सवालही मनोज नांगरे यांनी केला.
मनोज नांगरे यांनी आटपाडी वनविभागाच्या कारभारा संदर्भात आटपाडीला आठवड्यातून एक वेळ मिळाला तरी येता आणि घरात बसून कामकाज असते का असे वन अधिकारी,कर्मचारी यांच्या वर ही निशाणा साधला. ते म्हणाले, वनक्षेत्रपाल म्हणून काम करणाऱ्या अशोक खाडे यांच्यापेक्षा काही पाऊले वरचढ आणि मनमानी कारभारात वनपाल अस्मिता पाटील पुढे आहेत. त्यांच्यामुळे शासनाचे आणि वनविभागाचे मोठे शासकीय नुकसान झाले आहे.वनविभागाने रोपांच्या टक्केवारीत बोगसगिरी केली आहे. प्रत्यक्षात असणाऱ्या जिवंत रोपांपेक्षा जादा रोपे दाखविली आहेत. ६० टक्के रोपे जळालेली असताना ती १०० टक्के दाखवून त्याव्दारे बीले काढण्याचे काम वनपाल व सहकाऱ्यांनी केले आहे. पावसाळी झालेली वृक्ष लागवडीतील रोपांना पाणी घातल्याचे बोगस दाखवून संरक्षणाच्या नावाखाली आटपाडीतील वनमजूर दाखवून बाहेरील बोगस व्यक्तीच्या नावे लाखो रुपयाची बीले काढणे असा गैर कारभार चालु असल्याचे निदर्शनास आले आहे:…
सेना अध्यक्ष मनोज नांगरे-पाटील…