संपादक:- पल्लवी चांदगुडे..
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क:-9373004029..
अष्टविनायक तीर्थक्षेत्र मोरगाव (ता. बारामती) येथे संकष्टी चतुर्थीच्या निमित्ताने मयुरेश्वर दर्शनासाठी भाविकांनी दिवसभर रांगा लावल्या होत्या. पहाटे पाच ते रात्री उशिरापर्यंत हजारो भाविकांनी मयुरेश्वराचे दर्शन घेतले. सध्या सुरु असलेल्या परीक्षांमुळे नेहमीच्या तुलनेत कमी गर्दी जाणवत होती
पहाटे गुरव मंडळींची प्रक्षाळ पूजा झाल्यानंतर मंदिराचा मुख्य गाभारा सर्व भक्तांसाठी खुला करण्यात आला. सकाळपासून पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर या भागातून गणेशभक्त मोरेश्वराच्या दर्शनासाठी आले होते. सकाळी ७ वाजता सालकरी यांनी श्रींची पूजा केली. दुपारी देवस्थानच्या वतीने महापूजा करण्यात आली. दिवसभर तप्त ऊन असूनही भाविकांनी रांगा लावल्या होत्या. दुपारी एकनंतर कमी असलेला भक्तांचा ओघ सायंकाळी पाचनंतर पुन्हा वाढला. मात्र, नेहमीच्या चतुर्थीच्या मानाने कमी गर्दी होती
बाजारपेठेतील दुकाने हार, दुर्वा, श्रींच्या प्रतिमा आदींनी सजवलेली होती. देवस्थानच्या वतीने महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. दिवसभर उन्हामुळे थंड पेयांना मागणी होती. थंड पेयांची दुकाने भाविकांनी फुलली होती. सायंकाळी भक्तांनी मंदिर परिसर पुन्हा फुलले होते. चंद्रोदयावेळी श्रींना पुन्हा नैवद्य दाखविण्यात आला. यावेळी आरतीप्रसंगी हजारो भाविक उपस्थित होते.