महा आवाज News

हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते निंबोडीचे नूतन उपसरपंच दत्तात्रय भापकर यांचा सत्कार

संपादक:- पल्लवी चांदगुडे..
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क:- 9373004029..

भाजप नेते व राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते हनुमान निंबोडी (ता. इंदापूर) ग्रा. पं.चे नूतन उपसरपंच दत्तात्रय जालिंदर भापकर यांचा बिनविरोध निवडीबद्दल इंदापूर येथे शुक्रवारी (दि.22) सत्कार करण्यात आला.

या ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी दत्तात्रय भापकर यांची दुसऱ्यांदा निवड झाली आहे. आगामी काळात निंबोडी गावच्या विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही याप्रसंगी भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी दिली.

यावेळी निंबोडी ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच सचिन भोईटे, अमर भोईटे, धनाजी भोईटे, तुषार वाघमारे आदी मान्यवर उपस्थित होते.

इतरांना शेअर करा