महा आवाज News

क्रांतीवीर नागनाथआण्णा नायकवडी यांच्या १२ व्या स्मृती दिन साजरा.

क्रांतीवीर नागनाथआण्णां,डॉ . पाटणकर यांच्यामुळेच दुष्काळग्रस्तांचे स्थलांतर थांबले:आनंदराव(बापू)पाटील

प्रतिनिधी:सुधीर पाटील..

आटपाडी दि . २२ रोजी ज्येष्ट स्वातंत्र्यसेनानी, पाणी संघर्ष चळवळीचे नेते, माजी आमदार डॉ . क्रांतीवीर नागनाथआण्णा नायकवडी यांच्या १२ व्या स्मृती दिनानिमित्त त्यांच्या आत्म्यास अभिवादन आणि प्रतिमेस पुष्पहार अर्पण करीत माणगंगा कृषी विद्यालय भिंगेवाडी – आटपाडी येथे स्मृतिदिन साजरा करणेत आला.
त्यावेळी -क्रांतीवीर नागनाथआण्णा नायकवडी, डॉ .भारत पाटणकर यांच्या चळवळीमुळेच दुष्काळग्रस्तांचे, पशु-पक्ष्यांचे, पिढ्यान पिढ्याचे दशावतार – स्थलांतर थांबले.असे उदगार पाणी संघर्ष चळवळीचे प्रणेते आनंदराव(बापू)पाटील यांनी काढले . सादिक खाटीक यांच्या समवेतच्या तत्कालीन पत्रकार व अन्य सहकाऱ्यांनी, डॉ .भारत पाटणकर क्रांतीवीर नागनाथअण्णा नायकवडी यांना डिसेंबर १९९२ मध्ये प्रथमतः आटपाडी तालुक्यात आणले.लाखो दुष्काळग्रस्तांच्या जीवनातला अत्यंत महत्वाचा पाणी प्रश्न नागनाथआण्णांच्या चळवळीमुळेच मार्गी लागल्याने, आटपाडीसह १३ दुष्काळी तालुक्यातील जनतेने नागनाथआण्णांची जयंती – पुण्यतिथी मोठ्या उत्साहाने आणि प्रचंड आत्मीयतेने साजरी करायला हवी . अशा अपेक्षा आनंदरावबापू पाटील यांनी व्यक्त करून, सद्यस्थितीतल्या उदासीनतेबद्दल खंत यावेळी व्यक्त केली.
१९९३ साली क्रांतीवीर नागनाथआण्णा नायकवडी, डॉ . भारत पाटणकर यांच्या नेतृत्वाखाली १३ दुष्काळी तालुक्यांच्या शेतीच्या पाण्याच्या लढ्याचे रणशिंग फुंकले गेले. चळवळीच्या प्रखर आंदोलने व रेट्यामुळेच त्या त्या वेळच्या सत्ताधाऱ्यांनी टेंभूच्या पूर्ततेसाठी भरीव आर्थिक तरतूद प्राप्त करीत ही योजना पूर्णत्वास नेली.शेती असणाऱ्या आणि नसणाऱ्या प्रत्येक कुटुंबाला ६ हजार घनमीटर समन्यायी पद्धतीने पाणी वाटपाचे धोरण चळवळीमुळेच स्विकारण्यात आले . बंदिस्त पाईपलाईनने सर्वत्र पाणी देण्याचा पथदर्शक प्रयोगही आटपाडी तालुक्यात शासनाने राबविला, हेच चळवळीचेच यश आहे . असे ही आनंदराव(बापू )पाटील – सादिक खाटीक यांनी यावेळी स्पष्ट केले.
काही भागात कृष्णामाईचे पाणी आल्यामुळे भागाचे पिढ्यान पिढ्याचे दशावतार संपले. काही गावातील देशभर होणारे स्थलांतर थांबले . प्राणी, पशु, पक्षी आणि जनतेचे पाण्याअभावी होणारे अनन्वीत हाल थांबले .काही भागातल्या जीवसृष्टीला नवसंजीवनी देण्याचे काम नागनाथआण्णांच्या चळवळीने केले.अन्य काही बाकी गावंचा समावेश केला आहे त्या गावाना नवसंजीवनी देण्याचं काम करणार आहोत असेही पाटील आणि खाटीक यांनी स्पष्ट केले .
या कार्यक्रमा वेळी पाणी वापर संस्था संचालक दिगंबर मरगळे ,सोपेकाॅम पुणेचे उमेश लेमटे, अमोल माने, भिमराव यमगर, अजय म्हारनूर, सामाजिक कार्यकर्ते अंकुश मुढे, कृषी महाविद्यालय आटपाडीचे प्राचार्य आर.एस.थोरात सर, प्रा. एस.डी. मोकाशी मॅडम, प्रा.ए.एस . कदम मॅडम, प्रा . आर . एस . पिंगळे मॅडम, प्रा.ए.एन.निचळ मॅडम, प्रा . पी.यु.हाके मॅडम, यासह परिसरातील शेतकरी व प्रशालेतील विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

इतरांना शेअर करा