महा आवाज News

सांगली जिल्ह्यातून जाणाऱ्या शक्ती पीठ रस्त्याला शेतकरी संघटनेचा विरोध

सांगलीवाडी येथे होणाऱ्या मेळाव्या मध्ये नागरिकानी मोठ्या संख्येने उपस्थित रहा असे आवाहन:शेतकरी संघटना अध्यक्ष मा.महेश खराडे

प्रतिनिधी:  सुधीर पाटील
आटपाडी

आटपाडी :दि.१८ रोजी सांगली जिल्ह्यातून जाणाऱ्या शक्ती पीठ रस्त्याला विरोध करण्यासाठी
शेटफळे,घाटनांद्रे,तिसगी,मणेराजुरी या ठिकाणी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष महेश खराडे यांनी बैठकी घेण्यात आल्या.

तसेच येत्या 23 मार्च रोजी सांगलीवाडी येथे होणाऱ्या मेळाव्यास मोठ्या संख्येने वरील सर्व गावातील नागरिकांनी उपस्थित रहा असे आवाहन शेतकरी संघटना अध्यक्ष महेश खराडे यांनी केले आहे.

यावेळी उमेश देशमुख, सतीश साखळकर यांनीही सर्वांना मार्गदर्शन केले,यां बैठकीमध्ये गणेश गायकवाड, विशाल गायकवाड, अमर शिंदे, वामन कदम, शरद जाधव, गुलाब मुलांनी,बसवेश्वर पावटे,प्रभाकर तोडकर,भोसले सर, आदिसह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.

इतरांना शेअर करा