प्रतिनिधी : सुधीर पाटील
आटपाडी
आटपाडी :आवळाई शेरेवाडी मार्गे (कौठुळी)जरेमळा येथील सहा किमी रोडच्या डांबरीकरण रस्त्यासाठी ४ कोटी ६३ लक्ष भरघोस निधी स्वर्गीय अनिल (भाऊ) बाबर यांच्याकडे पाठपुरावा करून ऊपलब्ध केल्याबद्दल सांगली जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे संचालक मा.श्री.तानाजीराव पाटील यांचा कौठुळी गावच्या वतीने यथोचित सत्कार करण्यात आला.
यावेळी कौठुळी गावचे मा.भारत(शेठ) कदम,बाबुराव चव्हाण,शिवाजी कदम,सिद्धनाथ जरे,मा. बापुसाहेब लोहार,विश्वजित कदम, मा.दिनेश कदम,सतिश कदम,हरी जरे,गोरख जरे, अमोल जरे,राजे चव्हाण,विष्णु चव्हाण,बाळु चव्हाण, मा.दत्तात्रय पाटील (पंच),मा.मनोज नांगरे-पाटील व सर्व राजकीय, सामाजिक मान्यवर,ग्रामस्थ ऊपस्थित होते.