प्रतिनिधी:- पल्लवी चांदगुडे…
इंदापूर तालुक्यातील निरगुडे या गावांमध्ये शेतकऱ्यांच्या हितासाठी उपोषणाला बसलेले भगवान खारतोडे व त्यांच्या पत्नी खारतोडे यांच्या उपोषणाला इंदापूर तालुक्याचे आमदार दत्तात्रय मामा भरणे यांच्या हस्ते स्थगिती देण्यात आली आहे.
बाजरी कांदा सोयाबीन तूर या पिकाचा पिक विमा ६ कोटी ७७लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला आहे हा सर्वात मोठा विजय आहे असे खारतोडे सांगत होते.
दुष्काळ निधीचे फॉर्म भरून घेण्यास सुरू केलेले आहे. यासोबत निरगुडे येथील १ कोटी ३९ लाख रुपयांच्या हर घर या योजनेची कार्यकारी अभियंता जिल्हा परिषद पुणे यांनी त्रयस्थ समितीमार्फत चौकशी करणार असल्याचे लेखी पत्र दिले आहे, असे भगवान खारतोडे सांगत होते.
साखर कारखाने बंद झाल्यावर चारा छावण्यावर चारा डेपो सुरू करणार असल्याचे आमदार भरणे यांनी आश्वासन दिल्याचे खातोडे यांनी सांगितले.