महा आवाज News

आवळाई,शेरेवाडी सहा कि.मी रस्त्यासाठी ४ कोटी ६३ लाख रुपये निधी मंजूर.

प्रतिनधी :  सुधीर पाटील
आटपाडी

आटपाडी :प्रधानमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत आवळाई,शेरेवाडी ते झरेमळा यां गावासाठी ६ किलोमीटर लांबीच्या रस्त्यासाठी तब्बल ४ कोटी ६३ लाख रुपये मंजूर झाल्याची माहिती सांगली जिल्हा बँकेचे संचालक तानाजीराव पाटील यांनी दिली आहे.
आवळाई,शेरेवाडी ते झरेमळा या गावचा दळणवळणासाठी आटपाडी तालुक्यास जोडला जावा यांसाठी रस्ता पूर्णत्वास येण्यासाठी गेल्या अनेक वर्ष झाले आवळाई,शेरेवाडीतील लोकांची रस्त्याला निधी मिळावा ही मागणी होती, मा.तानाजीराव पाटील यांनी स्वर्गीय.आमदार अनिल(भाऊ) बाबर यांच्याकडे पाठपुरावा केला होता. त्यांच्या या पाठपुराव्यामुळे आवळाई ते जरेमळा रस्त्याला दि.१६ रोजी मंजुरी मिळाली असुन लवकरच हा रस्ता डांबरीकरण कामाला सुरुवात होईल अशी माहिती तानाजीराव पाटील यांनी दिली आहे. त्यामुळे या गावांमधील ग्रामस्थांनी स्वर्गीय अनिल बाबर व मा.तानाजीराव पाटील यांचे आभार व्यक्त केले आहेत.

इतरांना शेअर करा