महा आवाज News

मतदार जनजागृतीकरीता बस स्थानक येथे पथनाट्याचे आयोजन

प्रतिनिधी :- पल्लवी चांदगुडे…

बारामती विधानसभा मतदारसंघात स्वीप कार्यक्रमाअंतर्गत बारामती बसस्थानक येथे मतदान व मतदार जनजागृती करण्यासाठी पथनाट्याचे आयोजन करण्यात आले.

यावेळी आगार प्रमुख वृषाली तांबे, बसस्थानक प्रमुख शिवाजी कानडे, ‘स्वीप’च्या प्रमुख तथा समाज कल्याण गृहपाल सविता खारतोडे आदी उपस्थित होते.

आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बारामतीविधानसभा मतदारसंघात मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर आणि सहायक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसीलदार बारामती गणेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली मतदान व मतदार जनजागृतीविषयक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहेत.

यावेळी तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्याच्या माध्यमातून मतदान करण्याबाबत जनजागृती केली. या कार्यक्रमास प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी प्रवाशांनी मतदान जनजागृतीची प्रतिज्ञा घेतली.

इतरांना शेअर करा