खिलार विजयी जनावरास यात्रा स्थळी होणार बक्षीस वितरण :सभापती संतोष पुजारी
प्रतिनिधी : सुधीर पाटील…
आटपाडी
आटपाडी :कृषि उत्पन्न बाजार समिती आटपाडी व ग्रामपंचायत करगणी यांच्या सयुक्त विद्यमानाने श्री लखमेश्वर उर्फ श्रीराम देवाच्या करगणी जनावरांच्या यात्रेमध्ये दि.१३ रोजी वार बुधवार रोजी सकाळी ११.३० वाजता खिलार जनावरांचे भव्य जंगी प्रदर्शन भरवण्यात आलेले आहे.
खिलार जनावरांचे प्रदर्शन पशू तज्ञ, पशू वैद्यकीय आधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली होणार आहे.यासाठी यात्रा कमिटी कडुन प्रदर्शनामध्ये विजयी खिलार जनावरांस रोख रक्कम बक्षीस दिले जाणार आहे.यात्रा दि.१० मार्च पासुन सुरु असुन कृषी उत्पन्न बाजार समिती व करगणी ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमानाने यात्रा भरवण्यात आली आहे.या तीन दिवसाच्या यात्रे मध्ये शेतकरी,पर राज्यातील व्यापारी यांनी मोठया प्रमाणात हजेरी लावली आहे यामुळे जनावरांची आवक भरपूर झाली आहे आणि खरीदी विक्री मोठया प्रमाणात केली गेली आहे ,
बाजार समितीचे सभापती मा.पै. संतोष (भाऊ) पूजारी, उपसभापती मा.राहूल गायकवाड, ग्रामपंचायत करगणीचे संरपच मा. सौ सुरेखा तात्यासाहेब व्हनमाने, उपसरपंच मा. साहेबराव खिलारी बाजार समितीचे संचालक सर्वश्री मा. सुबराव पाटील, सचिव श्री.शशिकांत जाधव सहा. सचिव श्री नारायण ऐवळे, जेष्ठ मार्गदर्शक तात्यासाहेब व्हनमाने, मा.बाळासाहेब कांबळे,शंकर कांबळे व्यापारी संघटनेचे नेते मा. विठ्ठल ढोबळे, कॉन्ट्रक्टर सुरेश लांडगे, नाथा सरगर, ग्रांमपचायत लिपीक उत्तम हाके इत्यादी मान्यवरांच्या उपस्थित बक्षीस वितरण यात्रा स्थळी होणार आहे.तरी यात्रेत खिलार जनावरांचे जंगी प्रदर्शना चा लाभ सर्व शेतकरी वर्गाने घ्यावा.असे आवाहन बाजार समितीचे सभापती मा.पै.संतोष (भाऊ) पुजारी यांनी केले आहे.