प्रतिनिधी :महेश झिटे…
छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदान दिना निमित्ताने धर्मवीरगड पेडगाव येथे सेवा समिती च्या वतीने मागील 7 वर्षापासून बलिदान स्फूर्ती दिन कार्यक्रम आयोजित केला जातो. यावर्षी कार्यक्रमाची सुरुवात पत्रकार बंधू व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून झाली. त्यानंतर समितीचे प्रवक्ते आरती रणसिंग,सचिन बिडवे, शिवकवी वैभव सांळुखे, शंभूव्याख्याते राकेश पिंजण , यांनी शिवशंभू विचारांचा जागर केला. राकेशदादा यांच्या तोंडून संभाजी महाराजांच्या संघर्षमय जीवनाच्या व्यथा अवघ्या तीन मिनिटांत सांगितलेली ऐकत असताना प्रत्येकाच्या डोळ्यातून अश्रूंची धार येत होती. ज्या ठिकाणी औरंगजेबाचे सिंहासन होते त्याच ठिकाणी शंभुराजे यांचं भव्य स्मारक व्हावे, येणाऱ्या शिवशंभू भक्तासाठी रस्ते व सभामंडप व्हावे तसेच सर्वात उंच भगवा बहादूरगड (धर्मवीरगड) येथे उभारण्यात यावा अशी समितीची इच्छा व्यासपीठावरील मान्यवर यांच्यासमोर व्यक्त केली.
त्यानंतर सामाजिक उल्लेखनीय योगदानासाठी जि.प.सदस्य मा. श्री सचिन जगताप व समाजसेवक मा.यशवंत गोसावी,पुरातत्व विभाग श्री विजय कुमार धुमाळ, शासकीयसाठी पनवेल उपजिल्हाधिकारी श्री दत्तात्रय नवले, वैद्यकीय डॉ. सौ. सुजाता भोसले, युवा उद्योजक शुभम वाडगे यांना शंभूगर्जना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले तसेच श्री छत्रपती प्रतिष्ठान श्रीगोंदा फॅक्टरी, दुर्गमित्र परिवार मुंबई, सह्याद्रीचे भुते सामाजिक संस्था, शिवक्रांती मोटिवेशनाल अकॅडमी, महा. राज्य यांना विशेष सन्मान देऊन गौरवण्यात आले. सचिन भाऊ जगताप यांनी रस्त्याचे काम लवकरच पूर्ण करू असे आश्वासन दिले, तसेच गडास उच्च प्रतीचे पर्यटन स्थळ बनवण्यास लागेल ते सहकार्य करू असे सांगितले. सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचे वंशज श्री विक्रमसिंह बाजी मोहिते, येसाजी कंकाचे वंशज श्री आकाश राजे कंक व नेतोजी पालकर यांच्या वंशज श्री गणेश पालकर यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी घनश्यामआण्णा शेलार,डॉ.प्रणोती जगताप,शुभांगीताई पोटे,पो.नि.ज्ञानेश्वर भोसले,आदेशशेठ नागवडे,ज्योतीताई खेडकर,सिमाताई गोरे,प्रतिभाताई झिटे,मिराताई शिंदे,सुवर्णाताई पाचपुते,इरफान पिरजादे,डॉ.निलेश खेडकर,बाळासाहेब धोत्रे, सर्व पत्रकार बांधव,विविध गावांचे सरपंच आणि ग्रामस्थ ,आसपासच्या सर्व शाळेतील विद्यार्थी व महाराष्ट्र भरातुन आलेले छत्रपती संभाजी महाराज सेवा समितीचे पदाधिकारी व शंभूप्रेमी उपस्थित होते.
या कार्यक्रमासाठी शंकर जाधव,भारती इंगावले,प्रविण झांबरे,आरती रणसिंग,आनंद लगड,माया खेंडके,सोनाली शिंदे,वंदना भापकर,लक्ष्मण वनपुरे ,आनंद औटी,सुनिल कदम आदिंनी मेहनत घेतली.
आकाश शिंदे यांनी कार्यक्रमाचे सुत्र संचालन केले व सुनील गायकवाड यांनी आभार व्यक्त केले.