प्रतिनिधी :गोकुळ चौधरी
“विश्वमांगल्य सभा” लोकप्रतिनिधी परिवार संपर्क विभाग यांचेद्वारे खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांच्या प्रमुख उपस्थितीत रावेर लोकसभा क्षेत्र तथा परिसरातील महिलांसाठी भुसावळ येथे “मातृ संमेलन” कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
सदर कार्यक्रमात खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांच्यासह कॉलेज ऑफ सोशल वर्क चोपडा येथील प्रा.डॉ.मोहिनी उपासनी, विश्वमांगल्य सभा अखिल भारतीय सह-संगठन मंत्री मा.पुजा देशमुख, विश्वमांगल्य सभा अखिल भारतीय संपर्क प्रमुख मा.शुभांगी मेंढे यांनी उपस्थित महिला वर्गास मार्गदर्शन केले.
यावेळी खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांच्यासह प्रा.डॉ.मोहिनी उपासनी, मा.पुजा देशमुख, मा.शुभांगी मेंढे, भाजपा महिला आघाडी प्रदेश उपाध्यक्षा डॉ.केतकी पाटील, भाजपा महिला आघाडी जिल्हाध्यक्ष सौ.रंजना पाटील, सौ.रजनीताई सावकारे ई. प्रमुख उपस्थितीत तर परिसरातील राजकीय, शिक्षण, वैद्यकीय, शासकीय, उद्योग क्षेत्रातील असंख्य महिला उपस्थित होत्या.