प्रतिनिधी: संजय शिंदे
११ मार्च छत्रपती संभाजी महाराज यांचा बलिदान दिन देव देश धर्म यासाठी मृत्याला सामोरे जाणारे छत्रपती संभाजी महाराज यांचे त्यागाचे मोल कधीच होऊ शकत नाही. याचीच आठवण ठेवून हिंगणीकर शाखेचे अशोकराजे राजेभोसले, सुपा परगना प्रमुख सुनीलराजे राजेभोसले आणि कळस इंदापूर शाखेचे निखीलराजे भोसले यांना एकत्रित करून सोबत श्री शाहू प्रतिष्ठान यवत व इतिहास संशोधक राहुल दोरगे पाटील व महाराष्ट्र पोलीस क्राईम न्यूज रिपोर्टर आदेश दोरगे पाटील राजेभोसले परिवाराचे मुळ स्थान असणार्या इंदापूर येथील मालोजीराजे भोसले यांच्या समाधी पादुकांना पुष्पांजली वाहण्याचा कार्यक्रम व इंदापूर गढी संवर्धनासाठी प्रयत्नशील असणारे शिवप्रेमी, सामाजिक कार्य करणाऱ्या मान्यवर तसेच इंद्रेश्वर मंदिर ट्रस्ट चे विश्वस्त यांचे सोबत एकत्रित येऊन कार्यक्रम केला. यावेळी राजेभोसले परिवारातील मान्यवरांना उपस्थित शिवप्रेमी व संवर्धन साठी काम करणारे कार्यकर्ते यांनी मालोजीराजे भोसले यांचे गढी बाबत असलेल्या अडचणी , एकत्रित येऊन साजरे करण्यात येणार्या उत्सवाची कार्यक्रमाची माहिती दिली सोबतच मालोजीराजे भोसले यांचे मृत्यू दिनी व जन्मदिन साजरा करण्याचा मानस असून यासाठी आम्हाला सहकार्य करावे ही मागणी केली. राजपरिवार वतीने यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन राजेभोसले परिवाराने दिले. तसेच गंलाडवाडी १ इथे तरुणांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या छत्रपती संभाजी महाराज यांच्या १५ फुटी मूर्तीस पुष्पहार अर्पण करण्यात आला . तसेच शंभू महाराज यांचे जयंती निमित्त पहाटेपासून साजरा करण्यात येणार्या जन्मदिन सोहळ्याबाबत राजेभोसले परिवारातर्फे गलांडवाडी गावकऱ्यांचे कौतुक केले. यावेळी विशेष सत्कार महसुली विभागात नुकतीच निवड झालेल्या अक्षय शिंगटे यांचा सत्कार सुनिल राजे भोसले, अशोकराजे भोसले पाटील, निखिल राजे भोसले यांनी राजेभोसले परिवारातर्फे केला. असेच शासकिय अधिकारी गावोगावी तयार होवोत व देशसेवा करावी असे मनोगत सुनिल राजे भोसले यांनी व्यक्त केले. कळस शाखेचे निखिलराजे भोसले यांनी, यासारखे कार्यक्रम आयोजित करणे हे काळाची गरज असून आपला इतिहास संशोधक करण्याची गरज असून यासाठी मी सर्व सहकार्य करण्यास तयार आहे हा कार्यक्रम आयोजित करणारे शिंगटे परिवारचे कौतुक केले .
आपल्या ला ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे तो टिकवणे आपली जबाबदारी आहे व असे कार्य करणारे शिंगटे परिवारचे हे कार्य कौतुकास्पद आहे असे मनोगत अशोक राजे भोसले पाटील यांनी व्यक्त केले.
भरतराव राजे भोसले यांनी विठोजी राजे भोसले यांच्या वशं विस्तार बाबत सखोल माहिती दिली. यावेळी इंद्रेश्वर मंदिर ट्रस्ट चे विश्वस्त संदीप वाशिंबेकर, सामाजिक कार्यकर्ते धीरज शहा, कापड उद्योजक रुपेश सोनी, इन्द्रेश्वर मंदिर पुजारी श्रीकांत गुरव तसेच गलांडवाडी १ चे युवा उद्योजक रमेश शिंगटे, महसूल सहाययक अधिकारी अक्षय शिंगटे, बापूदादा फिश मार्केट भिगवणचे चेअरमन भगवान महाडिक, धर्मवीर संभाजीराजे प्रतिष्ठान चे अध्यक्ष अमोल फलफले, निखिल शिंगटे, आकाश शिंगटे, शेखर शिंगटे, गणेश शिंगटे, हनुमंत कदम, नवनाथ गोसावी, अजय कदम, राहुल महाडिक, शाहू जाधव, शुभम दिवसे उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन अमर शिंगटे व शिंगटे परिवार यांनी केले.