प्रतिनिधी :महेश झिटे
श्रीगोंदा : श्रीगोंदा शहरात
जागतिक महिला दिनानिमित्त झाशीची राणी महिला ग्रुप तर्फे विविध क्षेत्रात कर्तृत्ववान ठरलेल्या महिलांचा सन्मान करण्यात आला यावेळी उपस्थित महिलांसाठी प्रसिद्ध निवेदक दीपक लांगोरे यांचा खेळ पैठणी आयोजन केले होते.त्या मद्दे मनीषा वाळके पैठणी च्या मानकरी ठरल्या. तर तारा रामचंद्र शिंदे या जेष्ठ अंगणवाडी सेविका पुरस्कार मानकरी ठरल्या. राणी लंके यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आले.
८ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त श्रीगोंदा शहरात विविध क्षेत्रात कर्तृत्ववान ठरलेल्या अनेक महिलांना पुरस्कार देण्यात आले.
त्या मद्दे राणी डांगे, गायत्री, ढ वळे,सावंत मॅडम, इत्यादी. पुरस्कार दिले
यावेळी महिलांसाठी होम मिनिस्टर खेळ पैठणीचा या कार्यक्रमाचे आयोजन केले होते खेळ पैठणीचा कार्यक्रमात विजेत्यांना बक्षीस देण्यात आले आहे. या कार्यक्रमाला महिलांनी गर्दी केली होती तसेच प्रतिभा गांधी, राजश्री शिंदे, मिरा खेडके अश्विनी जाधव, आरती कापसे, मीनल भिंताडे, शीतल मदने, सीमाताई गोरे यांनी चागलं नियोजन करून कार्यक्रम यशस्वी केला. तर सूत्रसंचालन विशाल चव्हाण व सतीश शिंदे यांनी केले.