महा आवाज News

आटपाडी तालुक्याचे कार्य व कर्तुत्व शिल्पकार श्रीमंत कर्मयोगी बाबासाहेब देशमुख (दादा) यांची जयंती साजरी

सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रातून विनम्र अभिवादन

प्रतिनिधी:   सुधीर पाटील
आटपाडी

आटपाडी :दि.१० रोजी माणदेशातील आटपाडी गांवचे थोर सुपुत्र श्रीमंत बाबासाहेब (दादा) देशमुख हे पुरोगामी समृद्ध खानदानी व्यक्तिमत्व असणारे या भागाचे शिल्पकार ठरलेले. त्यांनी सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, सांस्कृतिक या कार्याचा ध्वज या भागात सन्मानाने उभा केला. शिक्षणाची पवित्र गंगा गरिबाच्या घरोघरी पोहोचवून या भागातील नवरत्ने उभी केली, अशा महान तपस्वीचा जन्म ऐतिहासिक वारसा लाभलेल्या खानदानी देशमुख घराण्यातील एक थोर आदर्श वेक्ती म्हणून आटपाडीला लाभलेले श्रीमंत योगी बाबासाहेब देशमुख यांना विविध क्षेत्रात जयंतीनिमित्त तालुक्यातील सर्व स्तरातून अभिवादन करण्यात आले
यामध्ये दि आटपाडी एज्युकेशन सोसायटी आटपाडीच्या कार्यालयात श्री.अमरसिंह (बापूसाहेब) देशमुख चेअरमन यांचे शुभ हस्ते, श्रीमंत बाबासाहेब देशमुख सूतगिरणी येथे श्री. हर्षवर्धन देशमुख यांचे शुभ हस्ते, मानगंगा सहकारी साखर कारखाना लिमिटेड सोनारसिद्ध नगर आटपाडी येथे पुतळ्याजवळ सूतगिरणीचे माजी संचालक श्री.आप्पासो पाटील बनपुरी यांचे हस्ते, दि बाबासाहेब देशमुख सहकारी बँक येथे प्रधान कार्यालयावर बँकेचे चेअरमन श्री. दादासाहेब भीमराव पाटील यांचे शुभ हस्ते, बाबासाहेब देशमुख दूध संघ आटपाडी येथे श्री.दिग्विजय अमरसिंह देशमुख यांचे शुभ हस्ते ,आटपाडी एज्युकेशन सोसायटीचे सेवक मत मंडळ यांना आटपाडी येथे संस्थेचे चेअरमन श्री. सदाशिव मोरे सर यांचे शुभहस्ते, या सर्व ठिकाणी प्रथम प्रतिमापूजन संपन्न झाले तसेच आटपाडी एज्युकेशन सोसायटीच्या सर्व शाळा मधून मुख्याध्यापक व त्यांचे सर्व सहकारी यांचे उपस्थितीत प्रतिमा पूजन संपन्न झाले .तसेच श्रीमंत बाबासाहेब देशमुख यांचे जयंती निमित्त जिम्नॅस्टिक हॉल आटपाडी येथे भव्य तायक्वांदो स्पर्धा घेण्यात आल्या. याचबरोबर सामाजिक राजकीय शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रातील सर्व मान्यवरांनी बाबासाहेब देशमुख यांच्या प्रतिमेला अभिवादन केले.

इतरांना शेअर करा