महा आवाज News

परदेशी फ्रान्स शेती अभ्यासकांचा सावंतवाडी/ गोजुबावी गावामध्ये SPK शेती अभ्यास दौरा.

प्रतिनिधी आर्जून सावंत
बारामती तालुक्यात सावंत वाडी येथे परदेशी पाहुण्याचा गोरख आनंदराव यांच्या SPK शेतावर व मिलिंद वाल्मिक यांच्या देशी गावरानी बियांच्या बीज बँकेला भेट दिलेल्या पहिला मिळाले.

फ्रान्स वरून Farmers Dialogue International – (FDI) या जागतिक संस्थेचे 11 शेतकरी व MRA PACHGNI या संस्थेचे 5 फॉरनर शेतकरी टीम शिवार फेरी साठी आले होते .

त्यावेळी ते डॉ सुभाष पाळेक कृषी (SPK) तंत्र व या नैसर्गीक शेती पद्धती मधे भारतीय देशी गाईचे महत्व या विषयी सखोल माहिती घेतली व पुढे फ्रान्स मध्ये जाऊन या SPK शेती पद्धतीचे प्रयोग करणार आहेत असंही म्हणाले*
समींद्राताई देशी गावरानी बीज बँकेची* पाहणी करुन 150 प्रकारच्या भाजीपाला बियांची माहिती घेतली.

त्यांना प्रसाद घोंगडे यांनी SPK शेती विषयी इंग्लीश मधून संवाद साधुन संपुर्ण माहिती दिली.
या शिवारफेरी साठी FDI व MRA- PACHGNI या संस्थेचे बारामती मधुन भारताचे सदस्य व ज्येष्ठ नागरिक निवास चे संस्थापक अभय शहा यांनी नियोजन केले होते.

परदेशी शेतकरी अभ्यासकांनी या शेती पद्धती ची माहिती घेऊन समाधान व्यक्त केले.
त्यावेळी सावंतवाडी गावातील व बारामती नॅचरल SPK शेतकरी ग्रूपचे सर्व शेतकरी उपस्थित होते.

इतरांना शेअर करा