प्रतिनिधी आनंद पटवारी
पुणे शहरातील धायरी येध्ये धारेश्वर मंदिरात महाशिवरात्री मोठ्या उत्साहात संपन्न झाले आहे धारेश्वर हे खूप प्राचीन कालीन मंदिर आहे.
या प्रसंगी खडकवासला कार्याध्यक्ष म्हणून श्रीमती भाग्यश्री विकास कामठे यांनी आपले मत व्यक्त केले आहे
या मंदिरामध्ये महाशिवरात्र निमित्त मोठ्या संख्येने भाविक महादेवाच्या पिंडी वरती बेलफुल वाहताना व दर्शन घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत व्यवस्थापकांनी योग्य ते व्यवस्थापन केल्याचे पाहायला मिळाले.
आज महाशिवरात्रीचा सण आहे धारेश्वर हे मंदिर शहरातील प्रसिद्ध मंदिर आहे दरवर्षी येथे श्रावणातील सोमवारी आणि महाशिवरात्रीला येथे अनेक भक्त उत्साहाने येतात . उद्या दुपारी महाप्रसादाचा सोहळा पण आहे भाविक येथे उपास सोडायला येतात. खूप लांबून भाविक इथे येतात कारण हे जागरूक मंदिर म्हणून ओळखले जाते.