महा आवाज News

करगणी येथील लखमेश्वर देवाची जनावरांची यात्रा दहा मार्च पासुन

प्रतिनिधी सुधीर पाटील…
आटपाडी

कृषी उत्पन्न बाजार समिती व करगणी ग्रामपंचायत यांच्या संयुक्त आढावा बैठकीत निर्णय:सभापती संतोष पुजारी.

आटपाडी :करगणी येथील लखमेश्वर देवाची जनावरांची यात्रा दि. १० मार्च ते दि.१६ मार्च अखेर करगणी येथे भरविण्यात येणार असून यात्रे संदर्भात ग्रामपंचायत कार्यालय करगणी येथे कृषी उत्पन्न बाजार समिती व ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमानाने आढावा बैठक घेण्यात आली, यामध्ये करगणी यात्रे मध्ये शेतकरी, व्यापारी,जनावरे यांना स्वच्छ व मुबलक पिण्याचे पाणी तसेच रात्री उजेडासाठी दिवाबत्तीची सोय तसेच यात्रा ठिकाणी स्वच्छता करणे इत्यादी कामे बाजार समिती व ग्रामपंचायत यांनी सयुक्त विद्यमाने करण्याचे ठरले. या आढावा
बैठकीस बाजार समितीचे सभापती मा. पै. संतोष (भाऊ) पूजारी, उपसभापती मा.राहूल गायकवाड, ग्रामपंचायत करगणीचे संरपच मा. सौ सुरेखा तात्यासाहेब व्हनमाने, उपसरपंच मा. साहेबराव खिलारी बाजार समितीचे संचालक सर्वश्री मा. सुबराव पाटील, मा. माणिक गाढवे, मा. विठ्ठल गवळी, मा.दादासाहेब हुबाले, सचिव श्री.शशिकांत जाधव सहा. सचिव श्री नारायण ऐवळे, जेष्ठ मार्गदर्शक तात्यासाहेब व्हनमाने, मा.बाळासाहेब कांबळे,शंकर कांबळे व्यापारी संघटनेचे नेते मा. विठ्ठल ढोबळे, कॉन्ट्रक्टर सुरेश लांडगे, नाथा सरगर, ग्रांमपचायत लिपीक उत्तम हाके इत्यादी मान्यवरांच्या उपस्थित बैठक पार पडली. सदरच्या यात्रेत खिलार जनावरांचे जंगी प्रदर्शन तज्ञ पशू वैद्यकीय आधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली घेण्यात येणार आहे.यासाठी यात्रा कमिटी कडुन प्रदर्शनामध्ये विजयी खिलार जनावरांस बक्षीस वितरण होणार आहे. यासाठी यात्रेत शेतकऱ्यांनी पाणी साठा
करणेसाठी बॅरेल,टाकी घेऊन यावे. असे आवाहन बाजार समितीचे सभापती मा.पै.संतोष (भाऊ) पुजारी यांनी सर्व शेतकऱ्यांना केले आहे.

इतरांना शेअर करा