प्रतिनिधी:- पल्लवी चांदगुडे…
भिगवण गाव हे मोठ्या प्रमाणात विकसित होत असून भिगवण गावातून पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्ग जात असल्यामुळे दळणवळणाच्या दृष्टीने हजारो प्रवासी दररोज भिगवण गावातून अनेक ठिकाणी प्रवास करीत असतात त्यासाठी सर्वात जास्त प्रवासी हे एसटी बसमधून प्रवास करीत असतात त्यामुळे भिगवण येथील बस स्थानक अतिशय दुर्लक्षित व अस्वच्छ झालेले आहे त्यामुळे तेथून जाणाऱ्या प्रवाशांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे तसेच सदर स्थानकावर अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या न थांबता महामार्गावरून पुढें निघून जातात त्यामुळे प्रवाशी यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या लांब पल्ल्यांच्या गाड्यांना भिगवन येथे थांबा द्यावा व भिगवण बस स्थानकाचे दुरुस्ती करावी असे निवेदन विभाग नियंत्रक पूणे श्री कैलास पाटील यांचे कडे मराठा महासंघाचे पुणे जिल्हाध्यक्ष ॲड.पांडुरंग जगताप यांनी दिले.
तसेच बारामती वरून येणाऱ्या गाड्या भिगवन बस स्थानकात येत नाहीत त्याबाबत सूचना देऊन एक बस भिगवन बस स्थानकात व एक तक्रारवाडी बस स्थानकापर्यंत सुरू ठेवण्याबाबत योग्य तो आदेश देणे गरजेचे आहे व भिगवन बस स्थानकामध्ये दोन कंट्रोलर नेमण्याची मागणी करण्यात आली. सदर बाबीवर सकारात्मक मार्ग काढण्याचे आश्वासन विभाग नियंत्रक पूणे यांनी दिले.