महा आवाज News

केंद्राई माता शेतकरी उत्पादक कंपनीला परदेशी पाहुण्यांची भेट.

प्रतिनिधि:- पल्लवी चांदगुडे

पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील शिक्रापूर क्षेत्रातील केंदूर गावातील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन सामूहिक शेती व शेती माल खरेदी-विक्री करण्यासाठी कंपनीची स्थापना केली. या कंपनीला परदेशी पाहुण्यांनी भेट दिली असून ,केंद्राई माता कंपनीच्या कामाचे कौतुक केलेले पाहायला मिळाले.

केंद्राई माता ऍग्रो प्रोडूसर कंपनी मुळे केंदूर गावातील तसेच आसपासच्या गावातील शेतकऱ्यांना चांगलाच फायदा मिळत असल्याचे शेतकऱ्यांनी व्यक्त केले आहे.

शेतकऱ्यांच्या शेतीसाठी बी-बियाणे, औषधे पुरवणे तसेच त्यांना वेळोवेळी वातावरणात होणाऱ्या बदलानुसार त्यांना खते -औषधांचे मार्गदर्शन करण्याचे काम केंद्राई माता करत असल्याचे पाहायला मिळत आहे.

सध्या सर्व शेतकऱ्यांपुढे सर्वात मोठा प्रश्न हा मार्केटिंगचा असतो. उत्पादन केलेला माल हा कशाप्रकारे मार्केटमध्ये विक्री करायचा या अडचणीने प्रत्येक शेतकरी हा चिंतेत असतो. पण केंद्राई माता या शेतकरी उत्पादक कंपनी मुळे शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारे हमीभाव मिळाल्यामुळे शेतकऱ्यांची कोणत्याही प्रकारे नुकसान न होता फायदा होत असल्याचे शेतकऱ्यांनी व्यक्त केले आहे.

याप्रसंगी जपान, चीन,दक्षिण कोरीया, फिलीपिन्स ,व्हिएतनाम हे परदेशी पाहुणे तसेच कृषी विभागाचे मा.श्री अशोक जाधव साहेब ,विदिशा कन्सल्टसी चे प्रमुख  श्री आनंद पटवारी ,केंद्राई माता कंपनी अध्यक्ष श्री मंगेशराव गावडे, श्री सुभाषराव साकोरे, श्री मनेश थिटे ,श्री ज्ञानेश्वर सुक्रे, श्री अजित साकोरे ,श्री कल्याण सुक्रे ,श्री विलास सुक्रे, श्री पिराजी सुक्रे ,श्री जालिंदर लोखंडे, श्री उमेश सुक्रे, श्री सचिन सुक्रे ,श्री भाऊसो सुक्रे, श्री बबनराव सुक्रे, श्री प्रकाश सुक्रे व केंद्राईमाता कंपनी संचालिका.सौ.सुमन सुक्रे ,कृषी कन्या गटाच्या प्रमूख सौ.रेखा सुक्रे तसेच मोठ्या संख्येने महिला व ग्रामस्थ उपस्थित होते.

इतरांना शेअर करा