प्रतिनिधि :- सुधीर पाटील..
आटपाडी:शेटफळ येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेना कृषी सेलचे आटपाडी तालुका अध्यक्ष प्रकाश गायकवाड यांच्या वाढदिवसाचे औचित साधून शेटफळे येथे बैलगाडा शर्यतीचे आयोजन केले आहे.
आज दि.२३ रोजी सकाळी नऊ वाजता शेटफळे मध्ये तडवळे रोडवरील ‘रानमळा’ येथे माळावर शर्यती होणार आहेत. या कार्यक्रमाचे नियोजन समाधान जगदाळे, आप्पासो गायकवाड, अनिल दुबुले तसेच मित्र मंडळीयांनी केले असुन . स्पर्धा शासनाच्या नियमाप्रमाणे होणार असून, कार्यक्रमा ठिकाणी अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत प्रकाश गायकवाड यांचा वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे असे संयोजकांनी सांगितले आहे.
या स्पर्धेचे पहिले बक्षीस ९९०९ रुपये, दुसरे बक्षीस ६९०९ रुपये, तिसरे बक्षीस ४९०९ रुपये आहे. प्रकाश गायकवाड यांनी सर्वसामान्य जनतेचे व शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रकाश गायकवाड यांनी अनेक आंदोलने केली असून, सर्व सामान्य शेतकरी जनतेसाठी झटणारा नेता अशी ओळख निर्माण करून आपला ठसा उमटवला आहे, आपल्या लाडक्या नेत्याला शुभेच्छा देण्यासाठी बैलगाडा शर्यती स्पर्धा घेण्यात आली आहे.