प्रतिनिधी पल्लवी चांदगुडे…
भिगवण येधील ऐका पिडीत तरुणीने भिगवान मधील आरोपी आकाश उर्फ बंटी पिसाळ व सहील शेख यांच्या विरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता.
या प्रकरणी इंदापूर पोलिसांनी सहिल शेख याला अटक केली असून तब्बल चार महिने झाले तरी यातील मुख्य आरोपी आकाश उर्फ बंटी पिसाळ याला पोलीस अटक करत नाहीत. बंटी पिसाळ हा पोलिसांना मिळत नाही का? इंदापूर चें पोलीस त्यास जाणीव पूर्वक अटक करत नाहीत असा प्रश्न निर्माण झाला आहे. बंटी पिसाळ हा फरारी असून सुद्धा पोलीस त्याचा शोध का घेत नाहीत. हा आर्थिक संशोधनाचा भाग आहे.
दुसरीकडे पिसाळ याच्या वडिलांनीं फिर्यादी व तीच्या दोन साथीदारांच्या विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल केला असून त्यात हीं वालचंदनगर पोलीस या आरोपीना अटक करत नाहीत. एकंदरीत या दोन्ही गुन्ह्यात पोलिसांनी काय तडजोड केली असेल अशी चर्चा भिगवण परिसरात होतं आहे.
दोन्ही गुन्ह्यातील आरोपीचे हायकोर्टाचे व सत्र न्यायालयाने जामीन फेटाळून सुद्धा आरोपी वलचंदनगर व इंदापूर पोलीस ठाण्यात बिनदास्त फिरत आहेत. जामीन फेटाळालेले आरोपी पोलीस ठाण्यात बिनदास्त ये जा करत असून देखील पोलीस अटक करत नसतील तर याचा अर्थ काय असू शकतो हा साधा प्रश्न आहे.
त्यामुळे आता या गुन्ह्यात नेमकी कोणी कोणी काय तडजोड केली याबाबत मोठा गौफ्यस्फोट होणार असल्याची माहिती हीं सूत्रांकडून मिळत आहे. आता या प्रकरणी पोलिसांच्या विश्वासहर्तेचा प्रश्न निर्माण झाला असून यात काय कारवाई होणार याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.