महा आवाज News

माध्यमिक विद्यालय वीरवाडी मदनवाडी येथे 75 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

यावेळी मदनवाडी ग्रामपंचायत च्या प्रथम नागरिक सरपंच सौ अश्विनी मारुती बंडगर यांच्या हस्ते ध्वजाची पूजा करून ध्वज फडकवण्यात आला यावेळी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत मार्च 2023 या परीक्षेत प्रथम तीन आलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला तसेच शालेय क्रीडा स्पर्धांमध्ये प्रथम दोन आलेल्या विद्यार्थ्यांचाही सत्कार यावेळेस करण्यात आला

यावेळी कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून पंढरीनाथ कोकरे माजी प्राचार्य हे उपस्थित होते त्याचप्रमाणे व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री रविंद्र कोकरे,वामन फुंदे, भागवत काळे, आप्पासाहेब बंडगर, संस्था अध्यक्ष नानासाहेब बंडगर , बी एस बंडगर पत्रकार निलेश, गायकवाड पत्रकार संजय शिंदे, अर्जुन बंडगर ,गौतम नीरु, सुनील कुंभार माजी सैनिक शहाजी बंडगर, बापू शिंदे, बाळासाहेब बंडगर , मदनवाडी गावचे पोलीस पाटील नानासाहेब वनवे आदी मान्यवर उपस्थित होते.

शाळेतील मुख्याध्यापक सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी हा कार्यक्रम व्यवस्थित पार पाडला.

इतरांना शेअर करा