महा आवाज News

८४ होवो, ९० होवो हे म्हातारं काही थांबत नाही”; शरद पवारांचा सत्ताधाऱ्यांना इशारा..

प्रतिनिधी:- पल्लवी चांदगुडे..

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क:- 9373004029..

येत्या काही दिवसात राज्यात विधानसभा निवडणुका जाहीर केल्या जाण्याची शक्यता आहे. यादरम्यान राज्यात राजकीय वातावरण तापण्यास सुरूवात झाली आहे. यातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवार हे संपूर्ण ताकदीनिशी निवडीणुकीच्या मैदानात उतरल्याचे पाहायला मिळत आहे. फलटणमधील सभेत शरद पवारांनी वय कितीही झाले तरी आपण थांबणार नसल्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

शरद पवार नेमकं काय म्हणाले?

काही तरूण मुले माझा बोर्ड घेऊन उभे होते. त्यावर माझा फोटो होता आणि त्यावर लिहिलं होतं ८४ वर्षांचा म्हातारा. तुम्ही काळजी करू नका, अजून लांब बघायचंय… ८४ होवो, ९० होवो हे म्हतारं काही थांबत नाही. हे म्हातारं महाराष्ट्राला योग्य रस्त्यावर आणल्याशिवाय स्वस्थ बसत नाही. तुम्ही याची काळजी करू नका. या सगळ्या कामाला तुम्हा सगळ्यांची मदत अंतःकरणापासून होईल. याची खात्री मी बाळगतो, असेही शरद पवार यावेळी म्हणाले.

आज फलटण येथे संजीवराजे नाईक निंबाळकर आणि आमदार दीपक चव्हाण यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी सभेत बोलताना शरद पवारांनी सत्ताधारी पक्षांना इशारा दिला आहे.

इतरांना शेअर करा