प्रतिनिधी:जी पल्लवी चांदगुडे..
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क: – 9373004029.
जिजाऊ फेडरेशनच्या अध्यक्षा भाग्यश्री पाटील आणि माजी जिल्हा परिषद सदस्या अंकिता पाटील ठाकरे यांच्या समवेत महिलांनी महिला सक्षमीकरणाचा नारा देत साधला इंदापूरकरांशी संवाद
महाविकास आघाडीचे विधानसभेचे उमेदवार मा. मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या प्रचारार्थ जिजाऊ फेडरेशनच्या अध्यक्षा भाग्यश्री पाटील व माजी जिल्हा परिषद सदस्या अंकिता पाटील ठाकरे यांच्या समवेत महिलांनी पदयात्रेमध्ये उस्फूर्त सहभाग नोंदवीत माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांना विधानसभेत मोठ्याधिक्याने मतदान करून निवडून देण्याचे आवाहन करीत पदयात्रेच्या माध्यमातून नागरिकांशी त्यांनी संवाद साधला.
महिलांची संख्या मोठी असून त्यांची सुरक्षितता आणि त्यांच्या सक्षमीकरणासाठी देशाचे नेते शरद पवार आणि हर्षवर्धन पाटील यांना जनतेने साथ द्यावी यासाठी महिलावर्गाने मोठ्या प्रमाणात सहभागी होत या यात्रेमध्ये इंदापूर शहरातील नागरिकांशी त्यांनी संवाद साधला तसेच यावेळी त्यांनी हर्षवर्धन पाटील यांना मतदान करण्याचे आवाहन केले .
यावेळी अनेक कार्यकर्ते यात्रेत सहभागी झाल्याने पदयात्रा मोठी होऊन इंदापुरात निवडणुकीचे मोठे वातावरण तयार झाले होते सर्वत्र तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हांच्या घोषणा सर्वत्र दुमदुमत होत्या.