प्रतिनिधी : पल्लवी चांदगुडे..
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क:- 9373004029..
राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष, मा.मंत्री मा.हर्षवर्धन पाटील यांच्या इंदापूर येथील भाग्यश्री निवासस्थानी प्रतिष्ठापना केलेल्या श्री गणरायाचे आज पर्यावरण पद्धतीने विसर्जन करण्यात आले. यावेळी त्यांच्या पत्नी, जिजाऊ महिला फेडरेशनच्या अध्यक्षा सौ.भाग्यश्री हर्षवर्धन पाटील, चिरंजीव व निराभिमा-कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजवर्धन पाटील व इतर यावेळी उपस्थित होते.
यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी गणरायाकडे इंदापूर तालुक्यातील व संपूर्ण देशातील नागरिकांच्या जीवनामध्ये आनंद, समाधान, समृद्धी येवो, सर्वांना सुबुद्धी मिळो ही प्रार्थना केली तसेच यंदा सगळीकडे खूप चांगला पाऊसही झाला आहे, त्यामुळं शेतकरी बांधवामध्येही उत्साह आहे. गणरायाची कृपा अशीच सर्व शेतकऱ्यांवरती ही राहो अशी देखील प्रार्थना यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी गणरायाकडे केली.