प्रतिनिधी:- पल्लवी चांदगुडे.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :- 9373004029.
इंदापूर विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार हर्षवर्धन पाटील यांचे विषयी जनतेमध्ये सहानुभूती वाढत असून, आपली नाती, आपली माणसं, आपला परिवार ग्रुपचे उमेदवार भीमराव जगन्नाथ शिंदे यांनी विधानसभा निवडणुकीमध्ये हर्षवर्धन पाटील यांना ग्रुपच्या वतीने पाठिंबा जाहीर केला आहे. इंदापूर येथे आयोजित मेळाव्यामध्ये हर्षवर्धन पाटील यांचेकडे रविवारी (दि.10) ग्रुपने पाठिंबाचे पत्र सुपूर्द केले.
हर्षवर्धन पाटील म्हणाले, ज्या समाजामध्ये आपण राहतो, त्या समाजाचे आपण काहीतरी देणं लागतो या सामाजिक जाणवेतून हा परिवार चांगले काम करीत आहे. या ग्रुपला आमचे कायम सहकार्य राहील, उपकाराची जाणीव ठेवणारे संस्कार आमचेवर आहेत. इंदापूर विधानसभा निवडणुकीत सक्रिय पाठिंबा दिलेबद्दल आमची माती, आपली माणसं, आपला परिवार ग्रुपचे हर्षवर्धन पाटील यांनी भाषणात आभार व्यक्त केले.
इंदापूर तालुक्यामध्ये आपल्या सामाजिक व महिलांसाठीच्या कार्याने आपली नाती, आपली माणसं, आपला परीवार हा ग्रुप 60 पेक्षा अधिक गावांमध्ये कार्यरत आहे. ग्रुपची स्थापना महादेव लोंढे यांच्या नेतृत्वाखाली झाली आहे. त्यांनी संजय गांधी निराधार योजनेचे सदस्य म्हणून काम पहिले आहे.
या मेळाव्यात ग्रुपचे संस्थापक महादेव लोंढे, उमेदवार भीमराव शिंदे, उपाध्यक्षा सुजाता घोगरे यांनी मनोगत व्यक्त करून हर्षवर्धन पाटील यांना पाठिंबा जाहीर केला. प्रास्ताविक ग्रुपचे सचिव नामदेव सोनवणे यांनी केले. यावेळी भाग्यश्री पाटील, अशोक घोगरे, अंकिता पाटील ठाकरे, स्वप्निल सावंत, परिवारचे तालुकाध्यक्ष जयवंत शिंदे, महिला तालुकाध्यक्ष चंद्रकला करे, प्रचारक व मार्गदर्शिका दमयंती जानकर तसेच छायाताई पडसळकर, काकासाहेब देवकर, जयश्री खबाले, विजय सिद, उज्वला गायकवाड, पूजा शिंदे व ग्रुपचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार भारत बनकर यांनी मानले.