प्रतिनिधी:- पल्लवी चांदगुडे..
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क:- 9373004029..
गेले काही दिवस इंदापूर तालुक्यातील विद्यार्थी स्पर्धा परीक्षेत आपल्या कर्तृत्वाचा ठसा सातत्याने उमटवताना दिसत आहेत. नुकत्याच हाती आलेल्या निकालात इंदापूर तालुक्यातील विविध गावातील विद्यार्थ्यांनी यशाला गवसणी घालून सरकारी नोकऱ्या मिळवल्या आहेत.
अशा गुणवंत विद्यार्थ्यांचा आज प्रवीण माने यांनी सोनाई पॅलेस येथे सत्कार करून त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
डाळज नं.१ येथील रोहन रवींद्र भोसले यांची ग्राम महसूल अधिकारी पदी, इंदापूरचे युवराज शंकर देवकाते यांची एस आर पी एफ पोलीस दल सोलापूर, बाभुळगावचे प्रथमेश तानाजी मोरे यांची मुंबई शहर पोलीस दलात, बिजवडीचे अभिजीत जेजेराम काळेल यांची मुंबई शहर पोलीस दलात, बिजवडीच्या शितल शिवाजी काळेल यांची रायगड पोलीस दलात, डाळज नं.१ येथील ऋषिकेश दत्तात्रय जगताप यांची मुंबई शहर पोलीस दलात,
पळसदेव चे विनोद सुनील भोसले यांची एस आर पी एफ सोलापूर दलात, पिंपरी खुर्द चे किरण भागवत कडाळे यांची मुंबई शहर पोलीस दलात, पडस्थळ चे रणजीत वसंत बोंगाणे यांची एस आर पी एफ पुणे दलात, सणसर चे पूजा प्रकाश घाडगे यांची ठाणे शहर पोलीस दलात नियुक्ती झाली तर रुई गावचे सचिन कांतीलाल दगडे यांची ग्रामविकास अधिकारी पुणे जिल्हा निवड झाली असून या मान्यवरांचा प्रविण माने यांनी आज सत्कार केला.
याप्रसंगी विठ्ठल आप्पा ननवरे, दादासाहेब सोनवणे, अनिकेत निंबाळकर, राजू भैय्या शेख, यशवंत कचरे, वसंत सोलनकर, किरण लावंड, शिवाजी जगताप, श्रीकांत मखरे, सपकळ साहेब, मयूर शिंदे,प्रतिक काळे, रोहन लावंड, मयूर देवकर, देविदास पाटील, आनंदराव गायकवाड, रामदास शिंदे, प्रीतम लावंड, कांतीलाल दगडे, अजिंक्य ढाणे, नवनाथ दगडे, संकेत वाघमोडे, दीपक अण्णा देव्हारे, शहाजान शेख, प्रीतम साठे, adv.आकाश बसळे, सुशांत भगत, बापू काळे आदी मान्यवर उपस्थित होते.