प्रतिनिधी:- पल्लवी चांदगुडे..
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क:- 9373004029..
निमगाव केतकी येथील श्री संत सावता माळी प्रतिष्ठान ट्रस्टच्या अध्यक्षपदी भानुदास राऊत, उपाध्यक्ष पदी ॲड.संदीप शेंडे, सचिव पदी निलकंठ भोंग तर खजिनदार पदी ज्ञानदेव भोंग यांची नुकतीच सर्वानुमते निवड झाली.
या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा निमगाव केतकी येथील श्री. संत सावतामाळी चौक या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला सत्कार समारंभ माजी बांधकाम आरोग्य सभापती जिल्हा परिषद पुणे तथा संचालक सोनाई उद्योग समूह प्रवीण माने यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी श्री संत सावतामाळी प्रतिष्ठान ट्रस्टच्या माध्यमातून नेहमीच सामाजिक उपक्रम राबवून सर्वसामान्यांना न्याय दिला जातो, गोरगरिबांचे लग्न, किंवा इतर कार्यक्रमासाठी नाममात्र भाड्यावर कार्यालय खुले केले असल्याने सर्वसामान्यांना याचा लाभ होत असल्याचे मत माने यांनी व्यक्त केले.
आज पार पडलेल्या या कार्यक्रमाचे आयोजन बबन खराडे व दादासाहेब शेंडे यांच्यावतीने करण्यात काळे होते तर यावेळी संदीप भोंग, देविदास भोंग,ॲड.सचिन राऊत माजी उपसरपंच अशोक मिसाळ, सोमनाथ भोंग, महेश जठार, मंगेश भोंग, बाळू डोंगरे, पवन मिसाळ, तसेच ट्रस्टचे सर्व संचालक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.