प्रतिनिधी:- पल्लवी चांदगुडे..
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क:- 9373004029..
बारामतीः येथील विद्या प्रतिष्ठानचे कला, विज्ञान, व वाणिज्य महाविद्यालय, व क्विक हील फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या सायबर शिक्षा फाॅर सायबर सुरक्षा या कार्यक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांनी बारामती टेक्स्टाईल पार्क मध्ये उपस्थित असलेल्या महिला कर्मचाऱ्यांना सध्या शासनाच्या सुरू असलेल्या लाडकी बहीण योजनेचा गैरफायदा घेऊन आँनलाईन फसवणूक टाळण्यासाठी विद्यार्थ्यांनी घेतलेली सायबर सुरक्षेची कार्यशाळा खूप भावली. तसेच आणखी काही योजनांमध्ये कशाप्रकारे सायबर हल्ले होत आहेत तेही पथनाट्याद्वारे विद्यार्थ्यांनी त्यांच्या समोर सादरीकरण करून सर्वसामान्य जनतेत सायबर जनजागृती किती महत्त्वाची आहे याची जाणीव करून दिली.
आपण या सायबर हल्ल्यापासून कशी सावधानता बाळगावी हे देखील त्यांना सांगितले.
या पथनाट्यद्वारे बारामती टेक्स्टाईल पार्क मधील जवळपास 3000 हून अधिक महिला कर्मचाऱ्यांमध्ये सायबर जनजागृती केली. उपक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी मा. खासदार सौ. सुनेत्रावहिनी पवार यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सध्याच्या मोबाईलच्या युगामध्ये अशा उपक्रमाची अत्यंत गरज असून समाजातील बरेच जण पैशाच्या खोट्या अमिषाला सहज बळी पडतात. हे टाळण्यासाठी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी केलेली सायबर जनजागृती अत्यंत महत्वाची आहे. कोणत्याही भूलथापांना लोकांनी बळी पडू नये असे आवाहन त्यांनी केले.
सायबर शिक्षा व सायबर सुरक्षा या उपक्रमाच्या स्पर्धेचे निकष विविध महाविद्यालय, शाळा , कंपनी यामध्ये जाऊन सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा या विषयावर सादरीकरण करणे, बुकलेट डाऊनलोड करणे, प्रश्नमंजुषा सोडवणे मास ऍक्टिव्हिटी, प्रमोशन ऍक्टिव्हिटी, इम्पॅक्ट ऍक्टिव्हिटी इ. सर्व निकषाच्या अंतर्गत या आठवड्यातील क्रमवारीत विद्या प्रतिष्ठान महाविद्यालय हे राज्यात दहाव्यास्थानावर आहे .
या उपक्रमासाठी अक्षय भोसले यांनी शिक्षक समन्वयक म्हणून काम पाहिले तसेच या उपक्रमासाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व प्रोत्साहन देण्याचे काम केले.
हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भरत शिंदे, उपप्राचार्य डॉ. श्यामराव घाडगे, उपप्राचार्य डॉ. लालासाहेब काशीद यांनी शुभेच्छा दिल्या तसेच बीबीए (सीए) विभाग प्रमुख महेश पवार, विशाल शिंदे, अनिल काळोखे, पूनम गुंजवटे, वैशाली , शुभांगी निकम, अक्षय शिंदे यांनी विशेष परिश्रम घेतले.