महा आवाज News

सर्व क्षेत्रात भारताची प्रगती – राजवर्धन पाटील

राजवर्धन पाटील यांच्या हस्ते कर्मयोगी सहकारी साखर कारखाना , इंदापूर कला , विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय , श्री. नारायणदास रामदास हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज , श्री. शिवाजी एज्युकेशन सोसायटी बावडा प्रशालेमध्ये ध्वजवंदन
भारत सर्व देशात 75 वा प्रजासत्ताक दिन साजरा करीत असून यानिमित्त युवा नेते व भाजप युवा मोर्चा कोअर कमिटीचे संचालक ,संस्थेचे संचालक राजवर्धन पाटील यांच्या हस्ते आज बिजवडी येथे कर्मयोगी सहकारी साखर कारखाना इंदापूर महाविद्यालयात श्री नारायणदास रामदास हायस्कूल व जुनिअर कॉलेज आणि श्री शिवाजी एज्युकेशन सोसायटी बावडा या ठिकाणी ध्वजवंदन करण्यात आले.
राजवर्धन पाटील यांच्या हस्ते विविध क्षेत्रात यश संपादन केलेल्या विद्यार्थी व मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.
राजवर्धन पाटील म्हणाले की ,’ जगात भारताची लोकशाही सर्वश्रेष्ठ असून प्रभावशाली राज्यघटनेने हे यश साध्य करता आले आहे.

देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात योगदान देणारे देशातील नागरिक आणि राज्यघटना निर्मितीचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि मसुदा समितीचे सदस्य यांना अभिवादन.

यावेळी मोठ्या संख्येने शिक्षक मान्यवर व विद्यार्थी उपस्थित होते.

इतरांना शेअर करा