महा आवाज News

विद्या प्रतिष्ठान मध्ये रॅगिंग प्रतिबंध सप्ताह संपन्न..

प्रतिनिधी:- पल्लवी चांदगुडे..

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क:- 9373004029..

बारामती येथील विद्या प्रतिष्ठानचे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे विद्यार्थी विकास मंडळ व महाविद्यालयीन रॅगिंग प्रतिबंध समिती यांच्या संयुक्त विद्यमाने रॅगिंग प्रतिबंध सप्ताहा निमित्ताने विशेष व्याख्यानाचे आयोजन केले होते.

‘महाविद्यालयीन युवकांचे मानसिक आरोग्य’ या विषयावर प्रख्यात समुपदेषक श्री. प्रशांत लोणकर यांनी महाविद्यालयातील २६५ विद्यार्थ्याशी संवाद साधला.

महाविद्यालयीन युवकांचे मानसिक आरोग्य सुरक्षित समाज निर्मितीसाठी अत्यंत मोलाचे ठरते– समुपदेशक श्री . प्रशांत लोणकर
मोबाईलच्या युगात विद्यार्थ्यांच्या बदलत्या जिवनशैलीनुसार तसेच समाजमाध्यमाच्या अतिवापरामुळे त्यांना मोठ्या प्रमाणात मानसिक ताण- तणावास सामोरे जावे लागत आहे. अशा स्थितीत भावनिक अस्थिरतेवर मात करण्यासठी बौद्धिक गुणांची नितांत गरज निर्माण होते ती पूर्ण करण्यासठी महाविद्यालायातील प्राध्यापक-प्राध्यापिका, मित्र-मैत्रीणी आणि पालकांचे योगदान अत्यंत महत्वाचे ठरते.


आवडते छंद जोपासणे, वाचन-मनन-चिंतन करणे, आवडते खेळ खेळणे व निसर्गरम्य परिसरात सहलीला जाणे यामधून हा ताण जरी थोडाफार कमी होत असला तरी युवकांचे भावनिक विरेचन होणे देखील तितकेच महत्वाचे ठरते असे मत त्यांनी याप्रसंगी व्यक्त केले. महाविद्यालयातील तरूणाई मध्ये
व्यासनाधीता हादेखील मोठ्या प्रमाणात नैरास्यातून येणारा एक मानसिक रोग आढळतो आहे.

सुजाण पालकांनी त्याकडेही योग्यवेळी लक्ष देणे अत्यंत म्हत्वाचे आहे. सातत्याने समुपदेशनातून कोणतीही व्यासानाधीन व्यक्ती पुर्णपणे बरी होते. हे त्यांनी सोदाहरण पटवून दिले व अशा व्यक्ती आपल्या आस-पास आढळून आल्यास मला ताबडतोब कळवा असे आवाहन त्यांनी केले.

कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांंच्या प्रश्नांना त्यांनी समाधानकार उत्तरे दिली. व्यासनाधीता व रॅगिंग प्रतिबंध कसा करावा यावरील माहितीपट दाखवून रॅगिंग प्रतिबंध सप्ताहाची सांगता झाली. या व्याख्यांनाचा महाविद्यालयातील २६५ विद्यर्थ्यांनी लाभ घेतला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. अमर भोसले यांनी केले तर रॅगिंग प्रतिबंध समितीच्या सामन्वक प्रा. सविता निकळे – साबळे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भरत शिंदे, व रॅगिंग प्रतिबंध समितीच्या सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.

इतरांना शेअर करा