प्रतिनिधी:- पल्लवी चांदगुडे..
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क:- 9373004029..
बारामती येथील विद्या प्रतिष्ठान कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या पाटी या एकांकिकेने पुरुषोत्तम करंडकाच्या अंतिम फेरीत धडक मारून द्वितीय क्रमांक पटकावला.
पुण्यासह महाराष्ट्रभर नावाजलेल्या पुरूषोत्तम करंडक एकांकिका स्पर्धेत (२०४-२५) पाटीतील अभिनेता सुजल बर्गे व अभिनेत्री श्रद्धा रंगारी यांनी भरत नाट्य मंदिरात अप्रतिम मूक अभिनय सादर करून सदाशिव पेठेतील भरत नाट्य मंदिरातील प्रेक्षकांची दाद मिळवून सर्वांच्या डोळ्यात पाणी आणले व न बोलताही जिंकता येते हे सिद्ध केले. या दोघांनाही अनुक्रमे सर्वोत्कृष्ट अभिनेता व अभिनेत्री हा पुरस्कार मिळाला.
तसेच उत्तेजनार्थ उत्कृष्ट विद्यार्थी दिग्दर्शक म्हणून सुबोधन जोशी यास पारितोषिक मिळाले अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ भरत शिंदे यांनी दिली. दमदार दिग्दर्शन व उत्कृष्ट अभिनय व संगीताच्या जोरावर महाविद्यालयाची एकांकिका ऑगस्टमधे पहिली फेरी जिंकून अंतिम नऊ संघात अंतिम फेरीसाठी दाखल झाली होती. दि. २१ व २२ सप्टेंबर रोजी अंतिम फेरीची स्पर्धा पार पडली. पुरुषोत्तम बेर्डे व शुभांगी गोखले यांनी या अंतिम स्पर्धेसाठी परिक्षक म्हणून काम केले.
विद्या प्रतिष्ठान महाविद्यालयाच्या संघाने पुरुषोत्तम करंडक स्पर्धेत द्वितीय क्रमांकाचा हरी विनायक करंडक पटकावला असून पाटी ही एकांकिका पुरुषोत्तम करंडकाच्या महाअंतिम फेरीत दाखल झाली आहे. पारितोषिक वितरण समारंभ सुप्रसिद्ध नाटककार चं.प्र. देशपांडे यांचे हस्ते शनिवार दि. २८ सप्टेंबरला भरत नाट्य मंदिरात संपन्न होणार आहे.
या एकांकिकेसाठी श्री आदेश यादव व सांस्कृतिक समिती प्रमुख डॉ हणमंतराव पाटील, डॉ अमर भोसले व विजय काकडे यांनी विशेष परिश्रम घेतले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ भरत शिंदे, उपप्राचार्य डॉ शामराव घाडगे व डॉ लालासाहेब काशिद, नीलिमा पेंढारकर, संस्थेचे अध्यक्ष आदरणीय शरदचंद्र पवार साहेब,उपाध्यक्ष अँड अशोक प्रभुणे, खजिनदार युगेंद्र पवार, सचिव अँड नीलिमा गुजर, विश्वस्त मा. अजितदादा पवार, मा. प्रतापराव पवार, सौ. सुप्रिया सुळे, सौ सुनेत्रा पवार, मा. विठ्ठलदास मणियार, डॉ राजीव शहा, श्री मंदार सिकची, श्री किरण गुजर, रजिस्ट्रार कर्नल श्रीषं कंबोज तसेच महाविद्यालयातील सर्व शिक्षक, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या आहेत.