प्रतिनिधी:- पल्लवी चांदगुडे..
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क:- 9373004029..
वरवंड येथील ३० खाटांच्या ग्रामीण रुग्णालयाची इमारात व अधिकारी निवासस्थाने बांधकाम करण्यासाठी सुमारे ३० कोटींचा निधी मंजूर करण्यात असल्याची माहिती दौंड तालुक्याचे आमदार राहुल कुल यांनी दिली आहे.
यावेळी आमदार कुल म्हणाले की, विधानसभा सभागृहात दि. २५ जून २०१९ रोजी मौजे वरवंड येथील ग्रामीण रुग्णालय स्थापन करणेबाबत अर्धातास चर्चा उपस्थित केली होती सदर चर्चेवेळी उत्तर देताना तत्कालीन आरोग्य राज्यमंत्री यांनी “विशेषबाब” म्हणून ग्रामीण रुग्णालय स्थापनेस मान्यता देण्याचे आश्वासन यावेळी दिले होते.
सदर दिलेल्या आश्वासनाप्रमाणे मौजे वरवंड (ता. दौंड, जि. पुणे) येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे ३० खाटांच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये श्रेणीवर्धन करण्यास राज्य शासनाने मान्यता दिली होती. त्यासाठी सुसज्ज इमारत व अधिकारी व कर्मचारी यांच्या निवासस्थान यांसाठी निधी मिळावा म्हणून आमदार राहुल कुल यांनी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार व आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचेकडे पाठपुरावा केला आहे.
त्यास मान्यता मिळाली असून मुख्य इमारतीसाठी सुमारे २५ कोटी रुपये व अधिकारी निवासस्थानासाठी ५ कोटी असा ३० कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना चांगली आरोग्य सुविधा मिळण्यास मदत होणार आहे.
याकामी सहकार्य केल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार व आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचे दौंड तालुक्यातील जनतेच्या वतीने आभार मानले आहेत.