महा आवाज News

राहुल कुल यांच्या सभेला दौंड करांचा मोठा प्रतिसाद.. दौंड मधील राहुल कुल यांच्या रॅलीची व सभेचे गर्दी पाहून राहुल कुल यांचा विजय निश्चित असल्याचे दिसत होती.

प्रतिनिधी:- पल्लवी चांदगुडे..

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क:- 9373004029..

पुणे जिल्ह्यातील दौंड तालुका मध्ये आमदार व महायुतीचे उमेदवार राहुल कुल यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

दौंड शहरातील छत्रपती शाहू महाराज स्मारक छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्या पर्यंत रॅली काढून जोरदार शक्ती प्रदर्शन करीत राहुल कुल यांनी व त्यांच्या कार्यकर्त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.
रॅलीसाठी आणि सभेसाठी मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी गर्दी केलेले पाहायला मिळाली.


आमदार राहुल कुल यांच्याविषयी दौंड करांच्या मनामनात हृदयात असणारे प्रेम चे ते रॅली चे आणि सभेचे चित्र दाखवून जात होते.राहुल कुल हे ओबीसी व धनगर समाजाच्या प्रश्नासाठी कायम बरोबर असतात म्हणून आपण देखील ठामपणे राहुल कुल यांच्या पाठीशी रहा असे आवाहन पडळकर यांनी केले.

यावेळी योगेश टिळेकर,प्रेमसुख कटारिया, वासुदेव काळे,नंदू पवार आदींनी मनोगत व्यक्त केले.यावेळी भारतीय जनता पार्टी यांसह महायुतीतील पक्षांचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.राहुल कुल हे गेल्या २४ वर्षांपासून राजकारणात सक्रिय असून भीमा पाटस सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन, गेल्या दहा वर्षांपासून आमदार असल्याने मतदारसंघात उत्तम पकड आहे.


मागील दोन्ही निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार रमेश थोरात यांचा पराभव केला असून आता तिसऱ्यांदा ते निवडणुकीला सामोरे जात असून यावेळी देखील माजी आमदार रमेश थोरात यांच्यासोबत सामना होणार आहे. विद्यमान व माजी आमदार असा हा सामना दौंड मध्ये होणार असून यावेळी कोण बाजी मारणार हेदेखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

याप्रसंगी विधान परिषद सदस्य गोपीचंद पडळकर योगेश टिळेकर प्रदेश उपाध्यक्ष कांचन कुल भाजपा, पुणे दक्षिणचे जिल्हा अध्यक्ष वासुदेव काळे उपस्थित होते. तसेच मोठ्या संख्येने दौंड तालुक्यातील ग्रामस्थ, युवा उपस्थित होते

इतरांना शेअर करा