प्रतिनिधी:- पल्लवी चांदगुडे..
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क:- 9373004029..
इंदापूर तालुक्यातील भांडगाव येथे माजी बांधकाम आरोग्य सभापती जिल्हा परिषद पुणे श्री प्रविण माने यांच्या संकल्पनेतून राबवण्यात आलेल्या नेत्र तपासणी शिबिरास भांडगाव व परिसरातील नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादाने सुरवात झाली. भांडगाव प्राथमिक आरोग्य उपकेंद्र भांडगाव येथे सकाळी दहा ते पाच या वेळेत ७९१ नागरिकांनी नेत्र तपासणी करून घेतली असून यातील ५२४ नागरिकांना चष्मे वाटप करण्यात आले तर १० नागरिकांची पुणे भारती विद्यापीठ येथे शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.
प्रविण माने यांच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचा असंख्य नागरिकांनी लाभ घेतला असून प्रत्येक गावात नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याचे चित्र आहे.
भांडगाव येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्र येथे आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाचे
बाळू गायकवाड, अजित मदने, सतीश पोळ, महेश गायकवाड, तुकाराम शिंदे, सनी चांडोले, निलेश रंधवे, छगन बनसुडे, अंकुश दोरकर यांनी आयोजन केले होते.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने राजेंद्र जाधव, दिनकर गायकवाड, गायकवाड सर, अमोल जाधव, नवनाथ गावडे, नवनाथ भोसले, कैलास शिंदे, बाळू माने, मनोहर कोकणे, गोपाळ ठोंबरे, बाळू गायकवाड, अमोल गायकवाड, सतीश पोळ, तुकाराम शिंदे, सनी चांडोले, अजित मदने, दत्तात्रय गायकवाड, रतनलाल सूर्यवंशी,
मयूर लोंढे, दीपक वीर, मुबारक आत्तार, समद सय्यद, नागेश गायकवाड, संदीप सोलनकर, निलेश रंधवे, संकेत वाघमोडे, संग्राम माने, छगन बनसुडे, गणेश मोहिते, निलेश माने, दिलीप कोकणे, शंकर कोकणे, महादेव जाधव, रामचंद्र गायकवाड, गणपत राऊत, युवराज कोकणे, अण्णा लावंड, विष्णू लावंड, देविदास परकाळे कांताबाई गायकवाड आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.