प्रतिनिधी:- पल्लवी चांदगुडे..
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क:- 9373004029..
बैलपोळा सणाच्या निमित्ताने शेतकरी बांधवांनी आमदार दत्तात्रय ( मामा) भरणे यांनी केलेल्या विकास कामांची पोचपावती देत प्रेमाने सर्जा राजाच्या सजावटीतून कृतज्ञता दाखवली.
लाकडी निंबोडी उपसा सिंचन योजना ही इंदापूर तालुक्याच्या जिव्हाळ्याचा विषय आमदार दत्तात्रय मामा भरणे यांच्या पाठपुराव्याने या योजनेस मंजुरी मिळवून प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली आहे. या कामाच्या प्रति शेतकऱ्यांनी ऋण व्यक्त केले.
यावर आमदार दत्तात्रय भरणे यांनी आनंद व्यक्त करत शेतकरी बांधवांच्या चेहऱ्यावरील आनंदाचा आणि त्यांच्या आयुष्याच्या विकासाचा एक छोटासा भाग होणे हे मोठे भाग्य आहे असे म्हणणे आहे.