प्रतिनिधी:- पल्लवी चांदगुडे..
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क:- 9373004029..
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अंतर्गत येणाऱ्या दौंड तालुक्यातील ५१ महसुली गावातील नागरिकांना प्रधानमंत्री आवास योजना (शहरी ) चा लाभ मिळावा यासाठी आपण सातत्याने पाठपुरावा केला, प्रकल्प अहवाल मंजुरी , योजनेच्या अंमलबजावणीतील विविध त्रुटी, अडचणी सोडवण्यासाठी, लाभार्थी अनुदान मिळावे यासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण व संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना वेळोवेळी सूचना केल्या, आज सुमारे ६०० हुन अधिक नागरिकांच्या हक्काच्या घरांचे स्वपन साकार होतानाच आनंद अवर्णीय आहे.
आजतागायत दौंड तालुक्यातील एकूण २५४६ लाभार्थ्यांची प्रकरणे मंजूर झाली व त्यातील पात्र लाभार्थाना कार्यारंभ आदेश देण्यात आले आहेत , डिसेंबर २०२४ पर्यंत उर्वरित सर्व पात्र लाभार्थ्यांना योजेनचा लाभ मिळवून देण्याचे शासनाचे उद्दिष्ट आहे. केंद्र शासनाने नुकतीच प्रधानमंत्री आवास योजना २ ला मंजुरी दिली असून या पुढील काळात अनुदानाची रक्कम देखील वाढण्याची शक्यता आहे तेव्हा नवीन प्रकल्प अहवाल तातडीने मंजूर व्हावेत यासाठी आपण प्रयत्नशील आहोत, अधिकाधिक नागरिकांनी याचा लाभ घ्यावा यासाठी आपण प्रयत्नशील आहोत.
प्रधानमंत्री आवास योजना (शहरी ) तील अडथळे दूर करून गोरगरिबांना हक्काचे घर मिळवून दिल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री मा. नामदार श्री. एकनाथराव शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री मा. नामदार श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब, मा. नामदार श्री. अजितदादा पवार साहेब, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणचे आयुक्त श्री. योगेश म्हसे यांचे मनःपूर्वक आभार !
यावेळी भाजपा प्रदेश उपाध्यक्षा सौ. कांचन कुल, भीमा पाटसचे उपाध्यक्ष श्री. नामदेव नाना बारवकर, भाजपा तालुकाध्यक्ष श्री. हरिभाऊ ठोंबरे, बाजार समितीचे सभापती श्री. गणेश जगदाळे, पंचायत समितीच्या माजी सभापती सौ. उषाताई चव्हाण, जेष्ठ नेते श्री. माऊली आण्णा ताकवणे, श्री. गोरख आण्णा दिवेकर, भाजपचे युवा मोर्चा तालुकाध्यक्ष श्री. बापू भागवत,किसान मोर्चा अध्यक्ष श्री. अरुण आटोळे पिंपळगावच्या सरपंच सौ. सुप्रियाताई नातु यांच्यासह लाभार्थी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.