शिर्सूफळ तालुका बारामती जिल्हा पुणे येथे 75 व्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून लोकशाही बळकट व्हावी तरुणांमध्ये देशभक्ती आणि सामाजिक बांधिलकी निर्माण होऊन त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा या उद्देशाने राजहंस फाउंडेशन च्या वतीने विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते,
यामध्ये महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन केले होते, यामध्ये बारामती तालुक्यातील अनेक विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभाग घेतला त्यामध्ये प्रथम क्रमांक अक्षदा बाळासो मोरे ,द्वितीय क्रमांक तेजश्री शंकर आटोळे, तृतीय क्रमांक प्रणाली लक्ष्मण किर्ते , चतुर्थ क्रमांक समृद्धी आनंद आटोळे यांनी पटकावला तर आकांक्षा आनंद आटोळे , प्रणिता तानाजी बिबे, स्वयम् दत्तू आटोळे आणि ओंकार पाटील यांना उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून प्रा. विकास शिंदे यांनी काम पाहिले,
तसेच याच संविधान जागर उपक्रमांतर्गत शेतकरी संघटनेचे नेते शिवाजीराव नाना नांदखिले यांनी उपस्थित सर्व शेतकरी बांधवांना आपल्या कृषिप्रधान देशातील शेतकऱ्यांची आणि शेती च्या आजच्या स्थितीवर मार्गदर्शन केले, तदनंतर फाउंडेशन च्या वतीने आयोजित महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध प्रबोधनकार व कीर्तनकार ह भ प ज्ञानेश्वर माऊली वाबळे महाराज यांचे तरुणांमध्ये वाचन संस्कृती निर्माण होऊन देशामध्ये स्त्री पुरुष जाती भेद धर्म भेद नष्ट होऊन लोकांमध्ये समता न्याय आणि बंधुता ही राज्यघटनेला अभिप्रेत असलेली समाज निर्मिती व्हावी असा एकतेचा संदेश देणारे सामाजिक प्रबोधन पर विशेष किर्तन संपन्न झाले,
यावेळी बारामती तालुका क्रीडा अधिकारी महेश चावले साहेब, सरपंच सौ जुई हिवरकर, फाउंडेशन चे अध्यक्ष ॲड.राजकिरन शिंदे ,बारामती कृषी उत्पन्न समितीचे संचालक विश्वास आटोळे, जिल्हा परिषद सदस्य आप्पासाहेब आटोळे, कोरेगाव भीमा विजय रण स्तंभ सेवा समितीचे उपाध्यक्ष शरद नाना चितारे, ॲड नितीन आटोळे मा संचालक दूध उत्पादन संघ बारामती , मा.सरपंच अतुल हिवरकर, अजित शिंदे, साबळेवाडी गावचे उपसरपंच गणेश साबळे मा. सरपंच गणेश शिंदे, राजहंस फाउंडेशनचे उपाध्यक्ष मिलिंद आटोळे, इत्यादी मान्यवर आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उस्थितीत होते , हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी आनंतआबा आटोळे,विजय आटोळे सर, ,बाबू शिंदे, सचिन शिंदे , अभिषेक क्षिरसागर,किरण महाराज हिवरकर , ,राकेश शिंदे , इ यांनी सहकार्य केले, कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजहंस फाउंडेशन चे अध्यक्ष ॲड राजकिरण शिंदे, यांनी केले तर सूत्र संचालन अनुष्का शिंदे यांनी केले आभार ॲड अक्षय शितोळे यांनी केले.