महा आवाज News

पवार साहेबांशी गद्दारी करणाऱ्या इंदापूरच्या आमदारांना जागा दाखवून द्या- हर्षवर्धन पाटील •बिजवडी परिसरात झंजावती दौरा •मतदारांमध्ये हर्षवर्धन पाटील यांच्या विषयी आपुलकीची भावना!

प्रतिनिधी:- पल्लवी चांदगुडे..

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क:- 9373004029..

•चौकट:-
======
आमचे पाहुणे गेले ते चांगले झाले – छगन भोंगळे

आमचे दोन पाहुणे असलेले पदाधिकारी आपलेतून गेले ते अतिशय चांगले झाले. ते सावली सारखे भाऊंबरोबर सतत असायचे.


आंम्हाला ते भाऊंच्या जवळ येऊन देत नव्हते, कारण त्यांना वाटायचे आम्ही जवळ गेल्यास, त्यांची भाऊंजवळ किंमत कमी होईल. आता आम्ही ते गेल्याची कसर भरून काढू, आता लढाऊ मावळे राहिले आहेत, शब्द व वचन पाळणारे मावळे आहेत, असे कर्मयोगी कारखान्याचे संचालक छगन भोंगळे यांनी नमूद करतात टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला.

इंदापूरचे विद्यमान लोकप्रतिनिधी हे आजपर्यंत पवार साहेबांच्या आशीर्वादावर विधानसभेला निवडून येत होते. त्यांना शरदचंद्रजी पवार साहेबांनी भरभरून दिले. तरीही पवार साहेबांशी अडचणीच्या काळात गद्दारी करणाऱ्या इंदापूरच्या आमदारांना विधानसभा निवडणुकीत मतदारांनी त्यांची जागा दाखवून द्यावी व पवार साहेबांना साथ द्यावी, असे आवाहन इंदापूर विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्षाचे व महाविकास आघाडीचे उमेदवार हर्षवर्धन पाटील यांनी केले आहे.

हर्षवर्धन पाटील यांनी रविवारी (दि.10) बिजवडी, वनगळी, राजवडी, गागरगाव, पोंदकुलवाडी या गावांमध्ये झंझावती प्रचार दौरा केला. या दौऱ्यात पोंदकुलवाडी (ता. इंदापूर) येथे हर्षवर्धन पाटील यांचे जोरदार भाषण झाले. हर्षवर्धन पाटील यांच्या दौऱ्यास जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कार्यकर्त्यांमध्ये वेगळा जोश निर्माण करण्यात हर्षवर्धन पाटील यशस्वी झाल्याचे चित्र दौऱ्यात दिसून आले. विशेष म्हणजे राज्यातील सुसंस्कृत नेते असलेले हर्षवर्धन पाटील यांचे विषयी जनतेमध्ये आपुलकीची भावना निर्माण झाली आहे.

हर्षवर्धन पाटील पुढे म्हणाले, इंदापूरच्या विद्यमान आमदारांना शरद पवारांनी आजपर्यंत 25 वर्षात भरभरून पदे दिली. सन 2019 च्या विधानसभा निवडणुकीत पवार साहेबांनी इंदापूरला सांगता सभा घ्यावी, म्हणून प्रचंड आग्रह केला, सदरच्या सभेमुळेच विजय झाल्याचे आता विद्यमान आमदार विसरले आहेत.

मात्र आम्ही राष्ट्रीय नेते, 84 वर्षाचे संघर्ष योद्धे शरदचंद्रजी पवार साहेब यांना त्यांच्या अडचणीच्या काळात साथ देण्याचा निर्णय घेतला आहे. पवार साहेबांची शक्ती आपल्या पाठीशी असल्याने काळजी करण्याचे कारण नाही, असे हर्षवर्धन पाटील यांनी नमूद करताच मतदारांनी टाळ्यांचा कडकडाट केला.

जे पवार साहेबांना सोडून गेले त्यांचा समाचार घेताना हर्षवर्धन पाटील म्हणाले की , हिरोचा झिरो व झिरोचा हिरो करण्याची ताकद राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षामध्ये आहे. तालुक्यातील स्वार्थी पुढारी एका बाजूला तर जनता आपल्याबरोबर आहे. ही निवडणूक मतदारांनीच आपल्या हातात घेतल्याने आपला व राज्यात महाविकास आघाडीचा विजय कोणी रोखू शकत नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले देशाचे संविधान कोणी बदलू शकत नाही, अन आंम्ही ते बदलू देणार नाही, असा इशाराही हर्षवर्धन पाटील यांनी दिला.

यावेळी पक्षाचे इंदापूर तालुका कार्याध्यक्ष महारुद्र पाटील यांनी भाषणात सांगितले की, तालुक्याच्या लोकप्रतिनिधींनी ठराविक ठेकेदारांना घेऊन 10 वर्षात रस्ते आणि कमिशन मधून मलिदा गोळा करण्याशिवाय दुसरे काम केलेले नाही.

एकही दूध डेअरी, कारखाना काढला नाही. उलट विद्यमान लोकप्रतिनिधींनी हर्षवर्धन पाटील यांचे कारखाने कसे अडचणीत येतील यासाठी प्रयत्न केले, याचे आंम्ही साक्षीदार आहोत, कारण हर्षवर्धन पाटील यांचेविषयी शेतकऱ्यांमध्ये चीड निर्माण व्हावी, वातावरण गढूळ व्हावे, असा विद्यमान लोकप्रतिनिधींचा प्रयत्न होता. विद्यमान लोकप्रतिनिधी हे गोड बोले व विश्वासघातकी माणूस आहे, अशी टीका महारुद्र पाटील यांनी केली.

कर्मयोगी शंकररावजी पाटील कारखान्याचे संचालक छगन भोंगळे यांनी आपल्या जोरदार भाषणात सांगितले की, विद्यमान लोकप्रतिनिधींनी कोणालाही रोजगार दिला नाही, खडकवासल्याचे पाणी आले नाही, उलट त्यामुळे कॅनॉल बुजत चालला आहे. खडकवासला कालव्याला पाणी आणण्यासाठी हर्षवर्धन पाटील यांनाच विजयी करा, असे आवाहन छगन भोंगळे यांनी केले.

यावेळी पक्षाचे तालुकाध्यक्ष अँड. तेजसिंह पाटील, अशोक घोगरे, प्रा. कृष्णाजी ताटे, हिरालाल पारेकर, संदीप कडवळे, मंगेश डोंगरे निलेश देवकर आदीसह पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रास्ताविक सय्यद पठाण यांनी केले. त्यात त्यांनी विरोधकांवर शेलक्या शब्दात टीकास्त्र सोडले. यावेळी हर्षवर्धन पाटील यांचा सत्कार मच्छिंद्र अभंग, नाना पोंदकुले, ज्ञानदेव भोंगळे, मेहबूब पठाण, मेजर खंडू बोराटे, पप्पू पोंदकुले आदींनी केला. तत्पूर्वी, कार्यकर्त्यांनी काढलेल्या दुचाकी रॅलीत हर्षवर्धन पाटील यांनी सहभाग घेतल्याने, कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

इतरांना शेअर करा