प्रतिनिधी :- पल्लवी चांदगुडे..
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क:- 9373004029..
सोनाई परिवाराचे संचालक तथा माजी बांधकाम आरोग्य सभापती जिल्हा परिषद पुणे प्रवीण माने यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेले मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर आज निमगाव येथील ग्रामीण रुग्णालय येथे संपन्न झाले.
जनसेवा हीच खरी ईश्वर सेवा हा वसा घेऊन समस्त इंदापूर तालुक्यातील नागरिकांच्या दृष्टी स्वास्थ्यासाठी आपण एक चळवळ उभारली असून, यात प्रत्येक नागरिकांनी आपला सहभाग नोंदवून, डोळ्यांसंदर्भातील समस्यांचे निवारण करून घ्यावे ही माझी आग्रही विनंती असल्याचे प्रतिपादन प्रवीण माने यांनी यावेळी केले.
निमगाव येथील ग्रामीण रुग्णालय येथे पार पडलेल्या आजच्या नेत्र तपासणी शिबिरात एकूण ६४३ नागरिकांनी सहभाग घेतला होता तर यापैकी तब्बल ३८९ नागरिकांना गरजेनुसार चष्म्यांचे वाटप करण्यात आले तर १४ गरजू रुग्णांवर पुणे येथील भारती विद्यापीठ हॉस्पिटल येथे मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.
सोमनाथ भोंग, पवन मिसाळ, अक्षय मोरे यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराचे नियोजन निलेश रंधवे, छगन बनसुडे व अंकुश दोरकर यांनी पाहिले.
आजचे शिबिराचे निमित्ताने भारत दादा मोरे, मच्छिंद्र चांदणे, भानुदास राऊत, चंद्रकांत हेगडे, भानुदास जगताप, दशरथ बनकर, शुभम शिंगाडे, ब्रह्मदेव शेंडे, समदभाई सय्यद, अमोल मुळे, भीमराव बोराटे, बबन खराडे, देविदास भोंग, मधुकर भोसले, दादासाहेब शेंडे, श्रीकांत करे,
अजित मिसाळ, सोमनाथ मिसाळ, संतोष जगताप, सागर मिसाळ, विकास चितारे, संदीप सोलनकर, आदर्श तरंगे, संदीप माने, सौरभ मिसाळ, प्रतीक भिसे, अक्षय मोरे, किरण देवकर, अनिल थोरात, सोमनाथ भोंग, संग्राम माने, तानाजी पाटील, किरण देवकर, आदर्श तरंगे, सचिन डोईफोडे, निलेश माने, नितीन बारवकर, निलेश भोंग, आप्पासो वाघमोडे, धनराज नलवडे, डॉ. शिर्के आदी मान्यवर उपस्थित होते.